आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी चिंचवड:- वाहन चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिपरी चिंचवड यांनी वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी उपाययोजना राबविण्यास सांगितले. त्याअनुषंगाने हिंजवडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना वाहन चोरीचे गुन्हयांना आळा घालुन गुन्हे उघड करण्याच्या सुचना केल्या होत्या.
त्यामुळे हिंजवडी पोलीस तपास पथकातील अधिकारी व अंमलदार असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, एका काळया रंगाचे नंबर पेल्ट नसलेल्या डिलक्स मोटार साकयलवरील इसमास ताब्यात घेवुन, नाव व पत्ता विचारला असता तो त्याने त्याचे नाव साहील मेहबुब शेख वय १९ वर्षे, रा. साखरेवस्ती, हिंजवडी पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे त्याच्या ताब्यात मिळालेल्या विना नंबर प्लेट असलेल्या मोटार सायकलबाबत चौकशी करता, त्याने सदरची मोटार सायकल ही भोईरवाडी माण येथुन चोरी करुन वापरत असल्याचे सांगितले.
त्याबाबत हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १२०७/ २०२४ भा. न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल असल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करुन, त्याची पोलीस कोठडी घेवुन, याचेकडे सखोल तपास केला असता त्याने खालील प्रमाणे गुन्हे केले असल्याचे उघडकीस आले आहे.
1) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १२०७/२०२४ भा. न्याय संहिता कलम ३०३ (२)
2) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं.८२९/२०२४ भा.न्याय संहिता कलम ३०३(२)
3) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ११५०/२०२४ भा. न्याय संहिता कलम ३०३(२)
4) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १३३५/२०२४ भा.न्याय संहिता कलम ३०३(२)
5) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १०८६/२०२३ भा.द.वि. कलम ३७९
6) चाकण पोलीस ठाणे गु.र.नं.९२३/२०२३ भा.द.वि. कलम ३७९
7) चाकण पोलीस ठाणे गु.र.नं.४३०/२०२१ भा.द.वि. कलम ३७९ खडक पोलीस ठाणे गु.र.नं. ३०६/२०२४ भा. न्याय संहिता कलम ३०३ (२)
8) आरोपी याने आणखी दोन मोटार सायकल चोरी केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन, त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या खालील मोटार सायकल बाबत तपास चालु आहे.
१) स्प्लेन्डर मोटार सायकल क्रमांक एम.एच.१४ बी.एफ.२९८४ २) स्लेन्डर मोटार सायकल क्रमांक एम.एच.१२ एल.एन.७६०७
आरोपी याने वरील प्रमाणे गुन्हे केलेल्याचे व त्याचेकडे एकुण २,०५,०००/- रुपये किंमतीच्या १० मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच दाखल गुन्हयाचा अधिक तपास चालु असुन आरोपी याचेकडुन आणखी गुन्हे केल्याचे उघड होण्याची शक्यता असुन त्याबाबत तपास चालु आहे.
सदरची कामगीरी विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, डॉ. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री विशाल गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पिंपरी चिंचवड, सुनिल कुहाडे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग पिंपरी चिंचवड, कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड व ऋषीकेश घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हिंजवडी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे सोमनाथ पांचाळ सहा. पोलीस निरीक्षक, अशोक दुधवणे श्रेणी पोलीस उप निरीक्षक तसेच अंमलदार नरेश बलसाने, कैलास केंगले, कुणाल शिंदे, प्रशांत गिलबिले, संतोष डामसे, विजय गंगजे, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, रवि पवार व विशाल भोईर यांनी केली.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…