महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन युपी:- देशात महिला आणि मुलीवर अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देशात महिला सुरक्षा हा मोठ्या प्रश्न निर्माण झाला आहे त्यात भाजपच्या आमदारानं आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलीसात जाऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी घटनेची कसलीही दखल घेतली नाही.
अखेर महिला अत्याचाराच्या या प्रकरणी एमपीएमएलए न्यायालयानं आरोपी भाजप आमदारासह इतर 16 जणांवर सामूहिक अत्याचार आणि धोकेबाजी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 10 दिवसांत गुन्हा दाखल करून संबंधित अहवाल कोर्टात सादर करावा, असे आदेश कोर्टानं दिले आहे. भाजपच्या आमदारा विरोधात अशाप्रकारे गुन्हा दाखल करण्याचे कोर्टानं आदेश दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
काय आहे हे प्रकरण?
ही खळबळजनक घटना उत्तर प्रदेश राज्यातील बदायू जिल्ह्यातील आहे. इथल्या सिव्हील लाईन परिसरात राहणाऱ्या एका महिलेची बिल्सीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार हरीश शाक्य, त्यांचे भाऊ आणि इतर काही जणांसोबत जमीनीचा वाद सुरू होता. यानंतर पीडित तरुणाने न्यायालयात केस दाखल करत, भाजप आमदार दमदाटी करून आपली कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.
याप्रकरणी 17 सप्टेंबर 2024 रोजी पीडित तरुण आपली आई आणि पत्नीसह भाजप आमदाराच्या कार्यालयात गेले होते. यावेळी भाजप आमदार हरीश शाक्य आणि इतर दोन जणांनी पीडित व्यक्तीच्या पत्नीसोबत सामूहिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित व्यक्तीनं आमदार हरीश शाक्य यांच्यासह 16 जणांविरोधात पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने पीडित व्यक्तीनं न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आता न्यायालयाने पोलीस प्रशासनाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
बदायू इथल्या एमपीएमएलए न्यायालयानं आरोपी भाजप आमदारासह इतर 16 जणांवर सामूहिक अत्याचार आणि धोकेबाजी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 10 दिवसांत गुन्हा दाखल करून संबंधित अहवाल न्यायालयात सादर करावे, असा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपा आमदार हरीश शाक्य यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत.
Behind the Scenes of Our Creative TransformationLooking for fashionable hoodies that get noticed? Check out…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ, समीक्षा आवथरे उपजिल्हा रुग्णालय अहेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार* मधुकर गोंगले, गडचिरोली…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ, समीक्षा आवथरे उपजिल्हा रुग्णालय अहेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार* मधुकर गोंगले, गडचिरोली…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…