आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- राज्यात महायुतीने जोरदार विजय मिळवून सत्ता स्थापन केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. पण अजून पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसून इतर खात्याची मंत्रिपद केव्हा जाहीर होतात आणि या महायुती सरकारमधील कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना पुण्यात राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस, भीम आर्मी स्टुडन्ट फेडरेशन आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायुती सरकार मधील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड, आमदार अब्दुल सत्तार, आमदार तानाजी सावंत आणि भाजपचे आमदार नितेश राणे या चार आमदारांना मंत्रीपदे देवू नका, या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी जोरदार आंदोलन केले. तसेच यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले की, मागील सरकारमध्ये शैक्षणिक विभागात अब्दुल सत्तार यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप, तर आरोग्य विभागामध्ये तानाजी सावंत यांनी देखील भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. तसेच एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर समाजात तेढ निर्माण करणारी विधान भाजपचे आमदार नितेश राणे हे सातत्याने करित आले आहेत. यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या चार आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, अन्यथा भविष्यात विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.
*कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ, समीक्षा आवथरे उपजिल्हा रुग्णालय अहेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार* मधुकर गोंगले, गडचिरोली…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ, समीक्षा आवथरे उपजिल्हा रुग्णालय अहेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार* मधुकर गोंगले, गडचिरोली…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…