परभणी जिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परभणी:- येथून एक मोठी बातमी हाती आली आहे. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी परभणी बंद जोरदार आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी लाठीचार्ज करत अनेक आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यां पैकी भीम सैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी वय 35 वर्ष यांचा कारागृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
परभणी आंदोलन प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी वय 35 वर्ष यांचा कारागृहात मृत्यू झाला असून, त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.या प्रकारामुळे परभणी शहरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमनाथ सूर्यवंशी हा लॉ चा विद्यार्थी होता. तो एल एल बी तृतीय वर्षात शिकत होता. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत सध्या काहीही स्पष्ट नाही. या तरुणाचे न्यायाधीशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव जमा होऊन आरोपीवर कडक कारवाई कारवाई म्हणून आंदोलन करण्यात येत होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांनंतर 50 जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा कारागृहातच मृत्यू झाला आहे. कारागृहातच या तरुणाचा मृत्यू झाल्याने शहरात पुन्हा अस्वस्थता आहे. तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. परभणी येथील आंबेडकरी आंदोलक असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस व्यवस्थेने बळी घेतलाय. लॉचां विद्यार्थी असणारा हा तरुण “न्यायालयीन कोठडीत” असताना मरण पावतो,ही अजूनच गंभीर बाब आहे. तो मेला का त्याला मारण्यात आले,हे पोस्टमार्टम झाल्यावर समजून येईलच…पण एक समाज म्हणून आपल्या समोर तोच प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो.. असे अजून किती सोमनाथ आपला जीव गमावणार आहेत..?
*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दर्शवली उपस्थिती...!* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले…
*कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व काँग्रेसनेते हनमंतु मडावी यांची उपस्थिती..!* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
*_नवजीवन नर्सिंग स्कूल चामोर्शी येथे परिचारिका शपथविधी कार्यक्रम संपन्न..._* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो.…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो .9764268694 बल्लारपूर ;-वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहर तर्फे…
Styling a Sp5der hoodie for a night out can be both fun and fashionable. Here…