शाळेच्या मुख्याध्यापक यांचा घेतला बळी, पुरवठादार अन् अधीक्षकाचे काय?
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहारातून विषबाधा झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही प्रकृती खालावली होती. मुदतबाह्रा तेलाचा वापर केल्याने ही विषबाधा झाल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे येताच शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले. परंतु या पोषण आहाराचा पुरवठा करणारे आणि यावर नियंत्रण ठेवणारे अधीक्षक यांचे काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेत एकूण ८७ विद्यार्थी पटावर असून, सोमवारी ८५ विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पोषण आहारातून मोड आलेली मोट व खिचडी देण्यात आली. हा पोषण आहार मुख्याध्यापक व शिक्षकांनी नियमानुसार आधी खाऊन विद्यार्थ्यांना दिला. त्यानंतर मंगळवारपासून विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही प्रकृती खालावली. मंगळवारी ८ वाजेपासून एकूण ५७ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता सर्व विद्यार्थ्यांना उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे
शिक्षकांना बजावली कारणे दाखवा नोटीस: विषबाधा प्रकरणाची प्राथमिक तपासणी हिंगणघाट पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी अल्का सोनवणे, विस्तार अधिकारी तथा प्रभारी पोषण आहार अधीक्षक अशोक कोडापे यांनी केली, त्यांच्या अहवालावरून मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले, तर शाळेतील सर्व शिक्षकांसह स्वयंपाकी व मदतनीस यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी कोण रडारावर येते, हे येत्या दिवसांत कळणारच आहे.
विस्तार अधिकाऱ्यांकडेच अधीक्षकांचा पदभार: शिक्षकांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. बुधवार आमदार समीर कुणावार यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. नीतू गावंडे यांनी दवाखान्यात भेट दिली.
हिंगणघाट पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक कोडापे यांच्याकडेच पोषण आहाराच्या अधीक्षकाचा पदभार आहे. त्यांच्या कार्यकाळात काही महिन्यांपूर्वी पोषण आहारातील तांदळाची विक्री झाल्याचे उघडकीस आले होते. इतकेच नाही, तर येथील पुरवठादार अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मुजोरी करीत असल्याचे शिक्षकांकडून सांगितले जात आहे. ‘माल घ्यायचा असेल तर घ्या नाहीतर सोडा.
प्राथमिक चौकशीत मुदतबाह्रा सोयाबीन तेल वापरल्याचे निदर्शनास आले त्यामुळे कामात हयगय केल्याचा ठपका ठेवत मुख्याध्यापक याना निलंबीत करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात चौकशी समितीमध्ये विस्तार अधिकारी असल्यास निष्पक्ष चौकशी होणार का?, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
पोहाणे यांना गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी निलंबित केले असून, या काळात समुद्रपूर पंचायत समितीत राहण्याचे आदेश दिले आहे. शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणे, शालेय पोषण आहाराची तपासणी करून त्यावर आता त्रिसदस्यीय समिती चौकशी करणार. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाली असून, आता त्रिसदस्यीय समितीचे गठण केले जाणार आहे. यामध्ये हिंगणघाट पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि लेखाधिकारी शालेय पोषण आहार यांचा समावेश असणार आहे. या समितीच्या माध्यमातून सखोल चौकशी करून आलेल्या अहवालांतील दोषींवर कारवाई केली जाणार आहे. यात जो दोषी असेल, त्यांच्यावर कारवाई होणारच, असे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. नीतू गावंडे यांनी सांगितले.
निलंबन रद्द करा, पालक आक्रमक: विषबाधेच्या घटनेनंतर प्राथमिक चौकशी करून मुख्याध्यापक अरुण पोहाणे यांना निलंबित करण्यात आल्याने गावकरी आक्रमक झाले आहेत. त्यांचे निलंबन तातडीने रद्द करून दोषी असलेल्या शालेय पोषण आहार अधीक्षकांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही पाल्यांना शाळेत पाठविणार नाही, अशी भूमिका वाघोलीवासीयांनी घेतली आहे. या संदर्भात पालकांनी आमदार समीर कुणावार यांची भेट घेऊन माहिती दिली आहे.
शालेय पोषण आहार योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाने शालेय पोषण आहार अधीक्षक हे पद निर्माण केले. अधीक्षकांनी वेळोवेळी शाळांना भेटी देणे, धान्यसाठा, दर्जा तपासणे, भरारी पथकामार्फत पोषण आहाराबाबत तपासणी करणे अशी जबाबदारीची कामे त्यांच्यावर सोपविली आहेत; पण या जबाबदारीतून त्यांना मुक्त केल्याप्रमाणेच ते वागत असल्याचे या प्रकरणातून दिसून येत आहे. या गंभीर प्रकरणातून शालेय पोषण आहार अधीक्षक व पुरवठादाराला वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. या शाळेला अधीक्षक अशोक कोडापे यांची एकही भेट नाही, कुठलीही तपासणी नाही; त्यामुळे त्यांच्यासह पुरवठादारावरही कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…