*पोलीस प्रभारी अधिकारी संतोष काजळे साहेब यांच्या नेतृत्वात कार्यक्रम यशस्वी*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
आज दिनांक 15/12/2024 रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे वतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मा.श्री. निलोत्पल सा. पोलीस अधीक्षक गडचिरोली ,मा. श्री. एम रमेश सा.(अपर पो.अधीक्षक प्रशासन) ,मा.श्री.यतीश देशमुख सा . ( अप्पर पो.अधीक्षक अभियान) गडचिरोली, मा. श्री. श्रेणिक लोढा सा. अपर पोलीस अधीक्षक (प्राणहीता ) अहेरी, यांच्या संकल्पनेतून व मा. श्री. दसुरकर सा.उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली उप पोस्टे रेपनपल्ली येथे भव्य जनजागरण मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे नियोजन माननीय प्रभारी अधिकारी पोउपनि संतोष काजळे सर यांच्या नेतृत्वामध्ये करण्यातआले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रेपणपल्ली येथील उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी भोयर सर हे होते. तसेच सीआरपीएफ चे पोलीस निरीक्षक गणपत सिंग सर, एस आर पी एफ चे शिवशरण सर, तसेच महिला पोउपनि प्रियंका मेश्राम मॅडम, पोउपनि सतीश पवार सर, जिल्हा परिषद शिक्षिका कुलसंगे मॅडम हे मान्यवर मंचावर उपस्थित होते. गडचिरोली पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या पोलीस दादालोरा खिडकीच्या अंतर्गत भव्य जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. वैद्यकीय अधिकारी भोयर सर व त्यांच्या टीम कडून नागरिकांची निशुल्क वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या वैद्यकीय तपासणीमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, मलेरिया इत्यादी महत्त्वाच्या टेस्ट करण्यात आल्या.उपस्थित महिला व पुरुष नागरिकांना प्लास्टिक घमेलांचे, मच्छरदाणी या साहित्यांचे वाटप उपस्थित सर्व महिला व पुरुष यांना वाटप करण्यात आले. तसेच हद्दीतील युवकांच्या खिलाडू वृत्तीला चालना देण्यासाठी व्हॉलीबॉल व व्हॉलीबॉल नेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित नागरिकांसाठी जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी रेपणपल्ली पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…