मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
दि. 16/12/2024
पुणे येथे आयोजित 19 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलाने पटकावली पदके
श्व् घातपात विरोधी तपासणी या स्पर्धेमधील ग्राउंड सर्च या उप-प्रकारात सिल्वर व ब्राॉझ तसेच श्वानपथक स्पर्धेमधील एक्सप्लोसिव्ह डिटेक्शन या उप-प्रकारात ब्राॉझ अशी तीन पदके पटकावली.
महाराष्ट्र राज्यात शहरांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, गुन्हेगारीचे स्वरुपही बदलत चाललेले आहे. त्यातच वेगवेगळा बंदोबस्त आणि तुलनेत अपुरे पोलिस बळ, अशा स्थितीत 24 तास ऑन ड्युटी राहणारे पोलिस आपले कर्तव्य यशस्वीरित्या पार पडण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. कंट्रोल रूम असो की पोलिस ठाणे कोणत्या क्षणी कोणती माहिती वा तक्रार पोलिसांकडे येईल, याचा नेम नसतो. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पोलीसांना नेहमीच सज्ज राहावे लागते. युद्ध कोणतेही असो सैनिक हा संपूर्ण साहित्यानिशी सज्ज असावा लागतो तरच, युद्ध जिंकता येते, हा साधा सरळ तर्क आहे. त्यामुळेच पोलिसांना अधिक सक्षम व अपडेट होणे अत्यावश्यक बनले आहे. पोलिसांनी कौशल्याने तपास कसा करावा; तसेच विविध प्रकारचे ज्ञान मिळावे, त्यांनी अपडेट राहावे, यासाठी पुणे येथे दिनांक 07 ते 12 डिसेंबर 2024 या कालावधीत 19 वे राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
पोलिसांनी व्यावसायिक नैपुण्य, गुणवत्ता कौशल्य, कार्यक्षमता व दर्जा वाढविणे हा मेळाव्या मागील उद्देश असून, राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. या मेळाव्यामध्ये एकुण 25 वेगवेगळ्या विभागांनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये गडचिरोली पोलीस दलास सातवे स्थान मिळाले आहे. पुणे येथे आयोजीत 19 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सायंटिफिक एड टु इन्वेस्टीगेशन, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडीओग्राफी, कम्प्युटर अवेअरनेस, अॅन्टी सॅबोटेज चेक, श्वान पथक इ. स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धेमध्ये लेखी, तोंडी परीक्षेबरोबरच प्रात्यक्षिक परीक्षाही घेण्यात आले असून, वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत परीक्षण करण्यात आले. सहा दिवस चाललेल्या विविध स्पर्धेमध्ये नागपूर परिक्षेत्राला पाच बक्षिस मिळाले असून घातपात विरोधी तपासणी या स्पर्धेमधील ग्राउंड सर्च या उप-प्रकारात गडचिरोली पोलीस दलातीत बीडीडीएस शाखेतील पोअं/9393 धम्मदिप मेश्राम हे सिल्वर व पोहवा/2489 पंकज हुलके हे ब्राॉझ पदकाचे मानकरी ठरले. यासोबतच गडचिरोली पोलीस दलातील हनी या श्वानाने श्वान पथक स्पर्धेमधील एक्सप्लोसिव्ह डिटेक्शन या उप-प्रकारात ब्राॉझ पदक पटकाविले. त्याबद्दल गडचिरोली जिल्ह्राचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी पदक प्राप्त जवानांचे व श्वानाचे कौतुक करत भविष्यात अशीच कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा दिल्या.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…