भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नागपूर कॅम्प ऑफिस, नागपूरचे प्रादेशिक संचालकांना दिले पत्र. विविध विषयांवरील प्रलंबित कामांसाठी बैठकीचे आयोजन.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या सूचनेनुसार आज सोमवार दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, (NHAI) प्रादेशिक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिव्हिल लाईन्स, नागपुर येथे प्रमुख विषयांच्या प्रलंबित कामांसाठीची बैठक आयोजित केली गेली.
यावेळी आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नागपूर कॅम्प ऑफिस, नागपूरचे प्रादेशिक संचालक यांना सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी टोल नाका तात्काळ हटविण्यात यावे, या विषयावर एक पत्र दिले.
“सावनेर-कळमेश्वर मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघातील सर्व प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी मी 10 डिसेंबर 2024 रोजी सर्व शासकीय प्रमुखांच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी हजारो नागरिकही मोठ्या अपेक्षेने आपली वैयक्तिक आणि मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी तेथे पोहोचले. प्रत्येक विषयावर विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. पाटणसावंगी येथे असलेल्या टोलनाक्यामुळे मतदारसंघातील लोकांनी त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या. नागपूर-सावनेर रोड टोलनाका हटवण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली. त्यांच्या मागणीनुसार, मी NHAI कर्मचाऱ्यांना सावनेर – कळमेश्वर मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात मागणी केल्यावर ती तातडीने काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले. 22 किमी अंतरावर 2 टोलनाके खपवून घेतले जाणार नाहीत, असेही लोकांनी ठणकावून सांगितले. या टोलमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लिपिक कर्मचारी व विद्यार्थ्यांना त्रास होत असून, या भागातील अवैध टोल हटविण्याची मागणी त्यांनी केली.
नागपूर-बैतुल महामार्ग हे या भागाचे कर्तृत्व मानले जात होते. सावनेर-नागपूर महामार्गावर बेकायदा टोलनाका उभारण्यात आल्याने सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाला बोजा बसला आहे. छिंदवाडा मार्गावरील केळवदजवळ २२ किलोमीटर अंतरावर दोन टोल नाके आहेत, जे आपल्या अधिकाराचा वापर करून सर्व लोकांकडून बेकायदेशीरपणे टोल वसूल करत आहेत. तसेच दोन टोलनाके नागपूर ते सौंसर जाणाऱ्या लोकांकडून दुप्पट टोल आकारत आहेत. सुरुवातीला सावनेर-पांढुर्णा मार्गावरील उमरी गावाजवळ पाटणसावंगी येथे हे टोलनाके उभारण्याची योजना होती. मात्र अनेक वर्षापासून पाटणसावंगी येथे हा बेकायदा नाका असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, अशा गंभीर विषयावर मागील लोकप्रतिनिधींनी गेली अनेक दशके मौन बाळगले होते. लोकांचे नागपूर, कोराडी येथे वारंवार येणे असते. पण, पाटणसावंगी येथील या अवैध टोलनाक्यामुळे जनतेच्या खिशावर मोठा बोजा पडत आहे. केवळ परिसरातील लोकच रस्त्याचा वापर करतात, असे नाही. छिंदवाडा आणि पांढुर्णा परिसरातील लोकही कोणत्याही कामासाठी विशेषतः वैद्यकीय उपचारांसाठी नागपूरला प्राधान्य देतात. मात्र पाटणसावंगी येथील या अवैध टोलनाक्यामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली. त्यामुळे पाटणसावंगी टोल नाक्यामुळे लोकांना होणाऱ्या त्रासाची खरी वस्तुस्थिती जाणून घेऊन ती दूर करण्याची कार्यवाही सर्वोच्च प्राधान्याने सुरू करा”, अशा आशयाचे पत्र आमदार डॉ.आशिषराव देशमुख यांनी NHAI च्या प्रादेशिक संचालकांना दिले आहे.
सावनेर-कळमेश्वर क्षेत्रातील इतर मार्गांबद्दल सुद्धा यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी यासंबंधी उपयुक्त सूचना केल्या. यावेळी बैठकीला आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्यासोबत भाजपाचे डॉ राजीव पोतदार, श्री मनोहर कुंभारे, श्री ठेंग साहेब (तांत्रिक सल्लागार, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण), श्री सिन्हा साहेब (प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण), मुख्य कार्यपालन अधिकारी, सावनेर, मुख्य कार्यपालन अधिकारी, कळमेश्वर, श्री चंद्रशेखर गिरी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग २ नागपुर, श्री सुनिल दमाहे, सहा. अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सावनेर, श्री रूपेश बोदडे, सहा. अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कळमेश्वर, श्री श्रीवास्तव, रेल्वे सहा. अभियंता, नागपुर विभाग, मंदार मंगळे, महेश चकोले, पियुष बोर्डे, अनंता पडाळ, पिंटू सातपुते, राजेंद्र जयस्वाल, धनराज देवके, अभिषेक धोटे आदी उपस्थित होते.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…