प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १७:- महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील ग्रामीण युवकांना रोजगार उपलब्ध करवून देण्यासाठी राज्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ह्या स्थापन केल्या. त्यात अनेक ग्रामीण गरजु विद्यार्थी – विद्यार्थीनी वेगवेगळ्या शाखेत औद्योगिक प्रशिक्षण घेऊन आपले भविष्य सुधारणा करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
अश्यातच मागील प्रथम वार्षिक सत्रात सावनेर औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रशिक्षण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण तसेच प्रात्याक्षिकांचे संसाधन उपलब्ध होत नसल्याचे व तेथील शिक्षक शिक्षिका यांचे संदेहास्पद वागणूक आदी सदर बाबींवर प्राचार्य यांना अनेक वेळी तोंडी व लेखी निवेदन देऊन ही विद्यार्थ्यांना न्याय मिळण्या ऐवजी त्यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली व विद्यार्थ्यांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केन्द्राच्या खोल्यांमध्ये डांबून त्यांना ना ना प्रकारच्या विचारणा करत आपली तक्रार परत घ्या अन्यथा तुम्हाला प्रँक्टीकल चे गुण देण्यात येणार नाही, तुम्ही कसे पास होता ते आम्ही पाहु, तुम्ही पास झाले तरी तुम्हाला कोणत्याही कंपनीत नौकरी लागु देणार नाही अश्या धमक्या देत विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ खंडोबा सातत्याने सुरु असुन आपल्या भविष्याची माती होऊ नये व आपल्याला न्याय मिळावा याकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेरच्या विद्यार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार व सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांना तहसीलदार सावनेर यांचे मार्फत निवेदन देऊन त्यांना मानसिक त्रास देत त्यांचे आयुष्य उध्वस्त करु पाहणाऱ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर चे प्राचार्य व शिक्षकवृंदांवर योग्य कारवाई करुण न्यायाची सामुहिक मागणी केली आहे.
सावनेर तहसीलदार यांचे अनुपस्थितीत नायब तहसिलदार प्रशांत गोविंदवार यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकार करत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व क्षेत्राचे आमदार यांच्या पर्यंत पोहचवीण्याची हमी देत पीडित विद्यार्थ्यांना दिलासा दीला आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर च्या विद्यार्थ्यांच्या निवेदनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार कसा न्याय करतील व विद्यार्थ्यांचे मानसिक शोषण तसेच त्यांच्ये उभे आयुष्य उध्वस्त करणाऱ्यां प्राचार्य व शिक्षकांवर काय कार्यवाही करतात यावर विद्यार्थी वर्ग तसेच त्यांच्या पालकांचे लक्ष वेधले आहे.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राज्याचे नेते आणि…