राजाराम खांदला उपपोलीस स्टेशन येथे भव्य आरोग्य मेळावा संपन्न.

*कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ, समीक्षा आवथरे उपजिल्हा रुग्णालय अहेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

  आज दिनांक 18/12/2024 रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे वतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मा.श्री. निलोत्पल सा. पोलीस अधीक्षक गडचिरोली ,मा. श्री. एम रमेश सा.(अपर पो.अधीक्षक  प्रशासन) ,मा.श्री.यतीश देशमुख सा . ( अप्पर पो.अधीक्षक अभियान) गडचिरोली, मा. श्री. लोढा सा. अपर पोलीस अधीक्षक (प्राणहीता ) अहेरी, यांच्या संकल्पनेतून व मा.श्री. अजय कोकाटे सा.उपविभागीय पोलिस अधिकारी प्राणहिता अहेरी , यांचे मार्गदर्शनाखाली उप पोस्टे राजाराम खां येथे “*भव्य आरोग्य मेळाव्याचे*”  आयोजन करण्यात आले.
     सदर भव्य आरोग्य मेळाव्याचे अध्यक्ष डॉ. समिक्षा अवथरे उप जिल्हा रुग्णालय अहेरी तर कार्यक्रमांचे उदघाटक मा.श्री.सुहास खरे माऊली सेवा मित्र मंडळ नागपूर,तर कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ.प्रदिप जोशी मेडिकल ऑफिसर शालिनीताई मेघे हाॅस्पिटल नागपूर, मा. डॉ.मिलिंद चांदेकर ,मा.भाष्कर तलांडे (माजी सभापती प. स. अहेरी,मा.उपसरपंच रोशन कंबगोणीवार राजाराम ,मा. सत्यम भंडारवार (पो.पाटील) रायगट्टा , मा. दामा गावडे (पो.पाटील) मरनेली ,मा.सुरेश दहागावकर (पो.पाठील) नंदिगाव ,तसेच जिल्हा पोलिस अधि./अंम. SRPF अधि./अंम. व हद्दीतील 150 ते 200 नागरिक उपस्थित होते. 
               सदर भव्य आरोग्य मेळाव्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीवीर शहीद भगवान बिरसा मुंडा,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पाहूण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून भव्य आरोग्य मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.       
सदर भव्य आरोग्य मेळाव्यात प्रभारी अधिकारी पोउपनि-आकाश जाधव हे आरोग्य मेळाव्याची प्रास्ताविका मांडले मेळाव्यात आलेल्या जनतेस मार्गदर्शन केले यानंतर प्रमूख पाहूणे म्हणून लाभलेले मा. डॉ.प्रदिप जोशी मेडिकल ऑफिसर शालिनीताई मेघे हाॅस्पिटल नागपूर यांनी उपस्थित राहून नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमांचे अध्यक्ष मिलिंद चांदेकर . यांनी मार्गदर्शन केले
  *   सदर आरोग्य मेळाव्याला नागपूर वरुन माऊली सेवा मित्र मंडळ नागपूर व शालिनीताई मेघे हाॅस्पिटल नागपूर तर उप जिल्हा रुग्णालय अहेरी, प्रा. आरोग्य.केन्द्र हे उपस्थित दर्शवली मेळाव्यात गावातील नागरिक तसेच आश्रम शाळा राजाराम येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी, आरोग्य तपासणी करीता उपस्थित झाले. सदर मेळाव्यात नेत्र तपासणी, सिकल सेल तपासणी, रक्तदाब तपासणी, इ. तपासणी झाल्या.तसेच गावातील 50 नागरीकांना दिनांक 20/12/2024 रोजी नागपूर येथे मोफत पुढिल उपचारासाठी पाठविण्यात येत आहे.
सदर भव्य आरोग्य मेळाव्यात उपस्थित सर्वाना जेवण ची व्यवस्था करण्यात आली.
      कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उप पोस्टे राजाराम खां येथील जिल्हा पोलीसचे  सर्व अधिकारी , अंमलदार, तसेच एसआरपीएफचे अधिकारी अंमलदार व spo यांनी मोलाचे सहकार्य केले .
सदर मेळावा 10.00 वा. सुरू करून 16.00 वा. यसस्वीरित्या कोणताही अनुचित प्रकार घडू न देता यशस्वी रित्या पार पाडण्यात आले आहे .या वेळी शेकडो नागरिकांनी आरोग्य मेळावाची लाभ घेण्यात आले आहे.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

राजाराम खांदला उपपोलीस स्टेशन येथे भव्य आरोग्य मेळावा संपन्न.

*कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ, समीक्षा आवथरे उपजिल्हा रुग्णालय अहेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार* मधुकर गोंगले, गडचिरोली…

5 hours ago

पाय रक्तबंबाळ झाले तरी चालेल, पण सुधीरभाऊंना मंत्रिपद हवेच.

*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…

17 hours ago

परभणी येथील दोषी अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी देवळी तहसीलदारांना निवेदन.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…

1 day ago

वाढदिवसानिमित्य शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…

1 day ago

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर येथे चाललं तरी काय?विद्यार्थ्यांना योग्य शिक्षणा ऐवजी मीळतो मानसीक त्रास.

प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…

1 day ago