नितेश पत्रकार यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आ. वि. प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे यवतमाळ येथील आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थी ४ दिवसापासून उपोषणाला बसले आहेत, शासनाला वेळोवेळी वस्तीगृहातील समस्या निदर्शनात आणून दिल्या परंतु आज पर्यंत त्या समस्येचे निराकरण झाले नाही. यासाठी समस्या घेऊन यवतमाळ येथील आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थी पांढरकवडा प्रकल्प कार्यालय धाव घेतली, शासनाकडे समस्या मांडल्या.
१) महाराष्ट्र शासनाच्या वार्षिक महागाई दरानुसार प्रत्येक वर्षी आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या जिल्हास्तरीय मुला-मुलींच्या वस्तीगृहा मध्ये लागू असलेल्या डी.बी.टी (DBT) या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी महागाई दरानुसार वाढ करण्याबाबत.
२) आदिवासी वस्तीगृहात प्रवेश झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीला 85 टक्के वस्तीगृहात राहणे बंधनकारक करण्यात यावे. आणि सतत ६० दिवस वस्तीगृहात विद्यार्थी व विद्यार्थिनी गैरहजर असल्यास वस्तीगृहातून त्यांचा प्रवेश रद्द करण्यात यावा. अशी मागणी घेऊन विद्यार्थी व विद्यार्थिनी चार दिवसापासून उपोषणाला बसले आहे. विद्यार्थी बिरसा ब्रिगेडचे गौरव पंधरे, राहुल दांडेकर, चेतन मॅकलवर, यांच्या निदर्शनात येताच नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार संजय देरकर यांना निवेदन दिले .
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सविस्तर माहिती खालील प्रमाणे…