आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुरकोनी येथील एका तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. विशाल रमेश चाफले वय 26 वर्ष असे या युवकाचे नाव असून त्याने बुधवार 18 रोजी सायंकाळच्या सुमारास लाडकी शिवारातील रेल्वे गेट क्र.18 जवळ रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, नैराश्येपोटी आत्महत्या केल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी मृतदेह स्विकारण्यास नकार दिला. आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा, नंतरच मृतदेह ताब्यात घेऊ, असा आग्रह धरीत कुटुंबीयांनी उपजिल्हा रुग्णालयात आक्रोश केला.
प्राप्त माहितीनुसार, 13 रोजी मृतक विशाल चाफले याच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी विशालला चौकशीसाठी हिंगणघाट पोलिस स्टेशन येथे बोलाविले होते. चौकशी झाल्यानंतर तो घरी गेला. काही वेळाने शेतात जातो म्हणून तो घराबाहेर पडला. मात्र, त्याने शेतात न जाता लाडकी शिवारात रेल्वेखाली उडी घेत त्याने आत्महत्या केली. गावातील जुन्या वैमनस्यातून हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मृतक विशाल हा घरातील मोठा मुलगा होता. त्याचा मिनी स्कूल बस तसेच ट्रान्सपोर्टचा छोटा व्यवसाय होता. गावातीलच चुलतभावाशी असलेल्या वादातून विशालला चोरीच्या खोट्या प्रकरणात अडकविण्यात आल्याने व स्वतःची आणि कुटुंबीयांची बदनामी झाल्याने नैराश्येपोटी त्याने आत्महत्या केल्याचा आरोप लहान भाऊ अनिकेत चाफले यांनी केला. दरम्यान, पोलिस पंचनाम्यानंतर विशालचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. आज गुरुवार 19 रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतकाच्या कुटुंबीयांनी आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी करीत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.
कालपासूनच मृतकाचे कुटुंबीय व बुरकोनी येथील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय परिसरात ठाण मांडून असून याप्रकरणी दोन इसमांसह एका महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. दरम्यान, आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातच पडून होता.
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…