श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी काय अशा प्रश्न आज सर्वांना पडला आहे. सरपंचाच्या हत्याकांडाने अगोदरच राज्यात खळबळ माजली असताना आता परत एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा हप्ता का जमा करत नाहीस असे म्हणून येथील नगरपालिकेच्या कार्यालयातील घरकुल विभागात कार्यरत कर्मचारी सिद्धार्थ गायकवाड यांना आज सकाळी 11.45 वाजता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवकाने जातीयवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. परळीचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात व तालुक्यात हत्याकांडाचे प्रकरणाचे प्रकरण ताजे असतानाच अशा प्रकारचे कार्यकर्ते कर्मचाऱ्यांना दादागिरी करताना दिसून ये आहेत
यावेळी त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यास कॅबिनमध्ये घुसून मारहाण केली. या प्रकाराने संतप्त कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. दरम्यान, याप्रकरणी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक अन्वर मिस्किन शेख यांच्यासहित तिघांच्याविरुद्ध दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सविस्तर माहिती खालील प्रमाणे…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील अल्लिपुर पोलीस स्टेशनच्या…