उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु – तुमकूर राष्ट्रीय महामार्गावर एका भीषण अपघातात मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कारवर कंटेनर कोसळून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना नेलमंगल जवळ जिल्हा तुमकूर येथे आज शनिवारी दि.21 सकाळी घडली.
या भीषण अपघातात चंद्राम इरगोंडा येगापगोळ वय 46 वर्ष पत्नी गौरम्मा चंद्राम येगापगोळ 40 वर्ष मुलगा ज्ञान वय 16 वर्ष मुलगी दिक्षा वय 12 वर्ष विजयलक्ष्मी मल्लिनाथ येगापगोळ -टकळकी वय 35 वर्ष आर्या मल्लिनाथ येगापगोळ-टकळकी वय 06 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने मरबगी गावावर शोककळा पसरली आहे.
जात तालुक्यातील मोरबगी येथील मुळ रहिवाशी असलेले आणि आता कर्नाटकातील बेंगलोर येथे स्थायिक झालेले चंद्राम येगापगोळ हे उद्योजक होते. त्यांची स्वतःची बेंगलोर येथे एचएसआरएलऔट परिसरात आएएसटी नावाची साँप्टवेअर कंपनी आहे. तसेच विदेशात त्यांचे उद्योग आहेत. ते आई-वडिलांना भेटण्यासाठी आपल्या मूळ गावी ते आपल्या कार वाहन क्र. KA 01 ND 1536 येत होते. कुटुंबीयांसोबत आई वडिलांना व नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी गावी येण्यास निघाले. चंद्राम यांनी लांबचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दोन महिन्यापुर्वीच दीड कोटींची नवी कार खरीदी केली होती.
बेंगळुरु-तुमकूर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगल येथून ते कारने जात असताना तुमकूरहून बेंगळुरुला निघालेला कंटनेर दुसऱ्या कारला साईट देताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. कंटनेर डिव्हायडरला धडकून दुसऱ्या बाजूला समोरुन येणाऱ्या चंद्राम इरगोंडा येगापगोळ यांच्या कारवर कोसळला. यात कारमधील सर्वांचा कंटेनर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी कर्नाटक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर हटवून मृतदेह बाहेर काढले.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…