राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शहर आणि उपनगर येथे मराठी लोकांची गळपेची सुरू असल्याच्या घटना समोर येत असल्यामुळे मुंबईत मराठी माणूस सुरक्षित आहे की नाही अशा प्रश्न निर्माण झाला आहे. कल्याण येथे अखिलेश शुक्ला याने मराठी कुटुंबाला गुंड आणुन मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच त्यात कल्याण येथून परत एक धक्कादायक बातमी समोर आली. आपल्या 9 वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी जाब विचारायला गेलेल्या मराठी कुटुंबाला आरोपीने पत्नीसह मारहाण केल्याचा प्रकार कल्याण पूर्वेकडील भागात घडला. याप्रकरणी आरोपी उत्तम पांडे वय 46 वर्ष आणि त्याची पत्नी रिना वय 40 वर्ष या दोघांविरोधात पोक्सो अंतर्गत तसेच मारहाणीचा गुन्हा मानपाडा पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाला आहे. महत्वाचे म्हणजे मारहाण झालेले पिडीत मुलीचे वडील मुंबईत पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.
पिडीत अल्पवयीन मुलगी शनिवारी 10 वाजताच्या सुमारास तीच्या मैत्रिणी सोबत खेळत होती. आरोपी पांडे याने तिला जबरदस्तीने घरात ओढून घेतले आणि तिच्याशी अश्लील चाळे केले. मुलीने घडलेला प्रकार घरी जाऊन आई वडीलांना सांगितला. याचा जाब पांडे ला विचारण्यासाठी संबंधित कुटुंब गेले असता पांडे आणि त्याच्या पत्नीने कुटुंबाला मारहाण केल्याचा प्रकार घडला. हा मारहाणीचा घडलेला प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
पिडीत मुलीचे वडील जखमी झाले आहेत. दरम्यान पिडीत मुलीच्या आईने मानपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पांडे पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अदयाप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. कल्याण पश्चिमेतील अखिलेश शुक्ला याने मराठी कुटुंबाला गुंड आणुन मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुर्वेकडील भागात घडलेली घटना पाहता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…