अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024 या तारखेला राष्ट्रीय युवा क्रीडा महोत्सव 2024 निमित्त राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धा पार पडल्या. त्यामधे वीरा वॉरियर्स ग्रुपच्या सहा खेळाडूनी यश प्राप्त केले व त्यांची नेपाळ येथे होणाऱ्या नेपाल इंटरनॅशल तायक्वांडो चॅम्पियनशिप या स्पर्धे करिता निवड झाली.
मुलाच्या वयोगटात यश गिरीष इंगळे, अथर्व अमोल चिखलकर, आयुष किशोर हमद यांची निवड झाली आहे. तर मुलींच्या वयोगटात आर्या मोहन कुत्तरमारे, आस्था नंदकिशोर रामटेके, सानवी अजय झलके यांची निवड झाली आहे. या खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट असे प्रदर्शन केले. व सर्वांचा अभिमान उंचावला त्या बद्दल वीरा वॉरियर्स ग्रुप चे संस्थापक रोहीत राऊत यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचाली करीता शुभेछ्या दिल्या.
त्याच प्रमाणे तायक्वांदो असोसिएशन ऑफ वर्धाचे सचिव श्याम खेमस्कर यांनी सुद्धा अभिनंदन केले. या सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील व प्रशिक्षक गौरव खिराळे व भूषण वाठोरे यांना दिले. हर्ष मून, रोहीत खैरकार, संकेत नगराळे, मयुर नगराळे, विशाल मडावी, रुचिका वानखेडे, छकुली पिसे, अदिती गायकवाड, तनश्री धानफोले, आस्था खैरे, वैष्णवी पिसे, कशिश खैरे, लक्ष्मी धानफोले व इतर सर्व पदाधिकारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…