*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी:नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतर आमदार धर्मराव बाबा आत्राम हे २१ डिसेंबर अहेरी गाठले.दरम्यान दुसऱ्याच दिवशी म्हणजे २२ डिसेंबर रोजी थेट सिरोंचा तालुक्याचा दौरा करत त्यांनी विकास कामांचा धडाका सुरू केला.
आ.धर्मराव बाबा आत्राम सिरोंचा तालुक्यातील पर्सेवाडा,नरसिंहपल्ली, तेकडा,जाफराबाद,रेगुंठा परिसरात दौरा करून कार्यकर्त्यांची बैठक घेतली.आमदार झाल्यावर त्यांचा हा पहिलाच दौरा असल्याने या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.त्यांनतर आ.आत्राम यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेतले.
विशेष म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी दिलेला शब्द पाळत येथील कंबालपेठा ते तेकडा रस्त्यावरील मोठ्या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन केले.त्यानंतर पर्सेवाडा-चिकेला-जाफराबाद रस्त्यावर सरंदान भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले.तसेच त्यांनी या भागातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन बामणी आणि अमरावती येथे खरीप पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत धान खरेदी केंद्रांचा शुभारंभ केला.याप्रसंगी कार्यकर्त्यांनी शॉल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते तथा राकॉचे जेष्ठ पदाधिकारी बबलू हकीम,राकॉचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,नगरसेवक जगदीश रालाबंडीवार,नगरसेवक सतीश भोंगे,नगरसेवक सतीश राचर्लावार,रामकीष्ठू नीलम,कोंडय्या कटकू,सत्यनारायण परपटला,गोविंद पेद्दी,वेंकटलक्ष्मी अरवेली,मधुकर मडावी,श्रीनिवास चिंतावार,कृष्णमूर्ती रिकुला,लक्ष्मण येरावार,मारन्ना नीलम,सरशील अकनपल्ली,सर्गती नरेश तसेच विविध गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…