राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालाड पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका तरूणाने एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली. यावेळी या तरूणाने पोलिसाला काठीने डोक्यात हल्ला केला त्यामुळे पोलिस अधिकारी बेशुद्ध होऊन खाली कोसळले. सहाय्यक फौजदार माणिक सावंत वय 52 वर्ष असे जखमी पोलिसांचे नाव असून अरुण हरिजन असे आरोपीचे नाव आहे तो काचपाडा परिसरात राहतो याप्रकरणी सावंत यांच्या तक्रारीवरून मालाड पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता कलम 109, 132, 353 अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्याला तरुणाला पोलिसांनी रोखले असता त्याने पोलिसावरच हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी मालाड परिसरातून समोर आला. यावेळी आरोपीने पोलिसाच्या डोक्यात काठीने हल्ला केला या हल्ल्यानंतर पोलीस अधिकारी जमिनीवर खाली कोसळला. आरोपी विरोधात या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मालाड पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार माणिक सावंत वय 52 वर्ष हे नाताळच्या सणा निमीत्त परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ते मालाड काचपाडा परिसरास गस्तीवर होते. त्यावेळी इतर दोन पोलिसही त्यांच्या बरोबर पोलिस मोबाइल व्हॅनमध्ये हजर होते. त्या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पाहणी करण्यासाठी सहाय्यक फौजदार सावंत तेथे गेले असता एक व्यक्ती वाहने विनाकारण अवडत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी सावंत यांनी त्याचा हात पकडून बाजूला नेले व त्याला तेथून जाण्यास सांगितले. त्यावेळी तो तरुण संतापला. त्याने तुला मारून टाकतो, असे बोलून बाजूला पडलेली काठी घेतली व सावंत यांच्या डोक्यात मारली. त्यामुळे सावंत बेशुद्ध होऊन खाली कोसळले. त्याबरोबर तो तरुण काठी तेथेच फेकून पळून गेला. सावंत यांच्यासोबत असलेले दोन पोलीस तेथे आले. त्यांनी सावंत यांना तात्काळ मालाड येथील तुंगा रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी सावंत यांच्यावर उपचार केले. त्यावेळी ते शुद्धीत आले.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दरवर्षी 22 डिसेंबर रोजी…
उषाताई कांबळे,सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- ग्राहकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ग्राहक रक्षक…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.25:- केंद्र आणि राज्य…
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे ॲड. सुधीर कोठारी यांनी केले अभिनंदन. मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले विविध मागण्याचे निवेदन. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र…