जिल्हाधिकारी नागपूर यांना उपविभागीय अधिकारी सावनेर मार्फत निवेदन.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 24:- सावनेर नगरपालिकेद्वारे शहरातील स्मशानघाट, पुतळे, बगीचा, लघु उद्यान सफाई व देखरेख करिता प्रत्येक मार्च महिन्यामध्ये निविदा काढण्यात येते त्याची मुदत १ एप्रिल ते पुढील वर्षाच्या ३१ मार्च पर्यंत असते. सावनेर पालिकेने मार्च २०२३ मध्ये शहरातील स्मशान घाट, पुतळे, बगीचा, लघु उद्यान सफाई करण्याच्या निविदा काढल्या व त्यामध्ये फक्त दोन निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्या दोन्ही निविदा जरी दोन वेगवेगळ्या नावाने असला तरी प्रशासकाच्या लाडक्या ठेकेदाराच्या नावे काम देण्यात आले.
त्या कामानुसार प्रत्येक स्मशान घाट रुपये २०९०० मासिक दराने, प्रत्येक पुतळा १६९०० रुपये मासिक दराने, प्रत्येक बगीचा २१९०० रुपये मासिक दराने, लघु उद्यान १८९०० रुपये मासिक दराने देण्यात आले. त्याचप्रमाणे गडकरी स्मशानघाट, चिचपुर स्मशानघाट, सावंगी पांधन स्मशानघाट, पहिलेपार स्मशानघाट, गुजरखेडी स्मशानघाट, मुस्लिम कब्रस्थान असे स्मशान घाटाचे मासिक १,२५,४०० व खेडकर लेआउट येथील बगीचा, गायकी ले आऊट येथील बगीचा, शकुंतला नगर येथील बगीचा, रेमंड कॉलनी येथील बगीचा, साई मंदिर येथील बगीचा असे एकूण पाच बगीच्याचे १९,५०० रूपये मासिक तसेच बस स्टॅन्ड वरील व पहिलेपार येथील आंबेडकर पुतळा लघुउद्यांनाचे ३७,८०० रुपये मासिक असे मिळून प्रत्येक महिन्याकाठी २,७२,७०० रुपये चे बिल ठेकेदार सादर करीत आहेत इतर कर वगैरे कपात करून प्रत्येक महिन्याला नियमित प्रतिमाह (अडीच लक्ष रुपये) २,५०,००० रूपये देयके काढण्यात आले आहे.
लाडक्या ठेकेदाराचे नावे मार्च २०२३ ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत ५४ लक्ष ३९ हजार ८२६ रुपयाची उचल करण्यात आली आहे. जेव्हा की वार्षिक निविदा मार्च २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंत होती.परंतु लाडका कंत्राटदार असल्यामुळे फेरनिविदा करून दुसऱ्याच्या नावे कंत्राट जाऊ नये म्हणून त्यालाच मुदत देऊन सर्रासपणे पैशाची उचल करून भ्रष्टाचार केला आहे. विशेष करून सदर बिले काढण्यात येत असताना विभाग प्रमुख याने काम समाधानकारक व व्यवस्थित होत असल्याच्या टिप्पण्या दिल्या आहे. मुख्यधिकारी किरण बगडे व प्रशासक संपत खलाटे डोळे झाकून बिले काढत आहे, खरी वस्तुस्थिती अशी आहे की, कोणताही बगीचा, पुतळा व स्मशान घाटाची सफाई होत नसून फक्त तीन-चार हजार रुपये महिन्याच्या एक व्यक्ती मार्फत थातूर मातूर साफ सफाई करण्यात येते. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. शहरात एखादा कार्यक्रम राहला तर पुतळा सफाईचे काम नगरपरिषदचे कर्मचारी करतात. त्यामुळे एवढा मोठा कंत्राट कंत्राटदाराला देऊन उपयोग काय ? अशा प्रश्न निर्माण झाला आहे.
करिता आपणास विनंती आहे की, सदर प्रकरणात दोन्ही प्रशासक व काही दलाल कंत्राटदाराशी संगणमत करून मार्च २०२३ पासून नियमितपणे अडीच ते तीन लाख रुपये महिन्यासाठी उचल करून भ्रष्टाचार करीत असून जनतेच्या पैशाची लूट करीत आहे. करिता आपणास विनंती आहे की संबंधित दोषी विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी विनंती नागपुर जिल्हा अध्यक्ष उत्तम कापसे यांनी केली आहे.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दरवर्षी 22 डिसेंबर रोजी…
उषाताई कांबळे,सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- ग्राहकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ग्राहक रक्षक…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.25:- केंद्र आणि राज्य…
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे ॲड. सुधीर कोठारी यांनी केले अभिनंदन. मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले विविध मागण्याचे निवेदन. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र…