मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिनगंघाट:- 21 डिसेंबर रोजी ब्लॅक लेडी फिल्म प्रोडक्शन हाऊस मुंबई ब्रांच हिंगणघाट चे उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. अनेक नृत्य सादर करण्यात आले. व गायनाचा संगीतमय प्रोग्राम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील अनेक धुरंदर गायकांनी आपल्या गायन सादर करून पाहुण्यांना मनोरंजनाचा आस्वाद दिला. या कार्यक्रमाला आगळं वेगळं रूप दिल.
यावेळी पितांबर काळे सर डायरेक्टर , पराग भावसार सर डायरेक्टर , कलाकारा उज्वला रोडगे, अभिनेत्री लीना पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उज्वला रोडगे व राजश्री वीरूळकर यांनी आपले नाट्य सादर केले. तर लीना पाटील, अक्षता जीवनकर, यश बारवदेवे, गौरी बारदेवे यांनी नृत्य सादर केले. सोबतच कार्यक्रमाचे आयोजक व ब्लॅक लेडी फिल्म प्रोडक्शन हाऊसच्या श्रीराधिका (मंगला ठक) यांनी सुध्दा नृत्य सादर केले. अजय चतारे, अरुण सुरजूसे सर, मुकेश रघाटाते, नितीन तायडे, राहुल गायकवाड, सचिन डफरे, तर गणेश जोशी, गौतम कोठारी, ज्योती कोचाडे, मंगेश हरबुडे यांनी आपले सुंदर गायन सादर करून कार्यक्रमास संगीतमय वातावरण केले.
यावेळी महेश अग्रवाल, किरण वैद्य, दुर्गाप्रसाद यादव, आरिफ भाई, एडवोकेट सुटे वकील, प्रकाश चौधरी, शुभम छबू, दीपक जाधव, अशा अनेक सामाजिक क्षेत्रातील व कलाकार क्षेत्रातील व निराधार संघटनेतील अनेक व्यक्तिमत्वांनी या कार्यक्रमास सहभाग घेऊन सदिच्छा भेट दिली.
अभिनेत्री श्रीराधिका म्हणजेच मंगला ठक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. या कार्यक्रमाचे ज्योती कोचाडे यांनी उत्तम संचालन केले.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दरवर्षी 22 डिसेंबर रोजी…
उषाताई कांबळे,सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- ग्राहकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ग्राहक रक्षक…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.25:- केंद्र आणि राज्य…
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे ॲड. सुधीर कोठारी यांनी केले अभिनंदन. मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले विविध मागण्याचे निवेदन. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र…