आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुणे जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नागरिकांचे रक्षणाची जबाबदारी असलेल्या एका नराधम पोलिसाने एका 5 वर्षीय अल्पवयीन चिमुरडी सोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याच्या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हात संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे पुण्यात रक्षकच बनला भक्षक असे दिसून आले आहे. हा धक्कादायक प्रकार नाताळच्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी घडला आहे.
लोणावळा येथे कार्यरत असलेल्या एका नराधम पोलिसाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. हा प्रकार विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला ही घटना घडली असून पोलिसाने केलेल्या या घृणास्पद प्रकाराचा तीव्र निषेध केला जात आहे. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता, याचं नशेत त्याने 5 वर्षीय अल्पवयीन चिमुरडीसोबत अश्लील चाळे केलेत. याप्रकरणी पोलिस सचिन सस्ते यांला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे ही घटना: ख्रिसमस निमित्त सुट्टी असल्याने अनेक पर्यटक विसापूर किल्ल्यावर येत असतात. कुठलीही अनुचित घटना नघडावी म्हणून नराधम पोलीस सचिन सस्ते तिथं बंदोबस्तावर होता. तिथल्याच एका हॉटेलमधून भाकरी घेतली अन त्याने जेवण केलं. त्याच भाकरीचे बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला, तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता. त्यावेळी तिथं 5 वर्षीय चिमुरडीला सचिन सस्ते याने बघितल, त्यानंतर तो लघुशंकेच्या बहाण्याने तो हॉटेलच्या मागे गेला अन चिमुकलीसोबत अश्लील चाळे करु लागला. मुलीने विरोध केला, मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असं तो तिला म्हणाला. मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला अन या नराधम पोलीस सचिन सस्तेचं बिंग फुटलं. ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता, त्याचं पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे.
पिढीत मुलीच्या आईने केली मागणी: अल्पवयीन मुलगी हॉटेलच्या मागे खेळत होती. त्यावेळी या पोलिसाने हा प्रकार केला. माझ्या मुलीने येऊन हा सगळा प्रकार सांगितला. जर पोलिसच असं करत असतील तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? असा सवाल विनयभंग झालेल्या अल्पवयीन मुलीच्या आईने विचारला आहे.
*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…
*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…
उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्ह्यातील बाळापूर येथून एक…
रविंद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात…
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी दिल्ली:- भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी…
भंडारा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- राज्यात महिला मुलीवर अत्याचार हत्याच्या घटना…