आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुणे जिल्हातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजगुरूनगर येथे घरा शेजारी राहणाऱ्या एका नराधमने 8 वर्षीय आणि 9 वर्षीय 2 अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असल्याने पुणे जिल्हात महिला आणि मुली सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. या हत्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी एका 54 वर्षीय नराधमाला बेड्या ठोकल्या आहे. या घटनेने संतापाची लाट उसळली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी हा एका स्थानिक हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतो आणि पीडित मुलींच्या शेजारीच राहतो, तसेत तो मुलींच्या कुटुंबियांना देखील ओळखत असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. 8 वर्षीय आणि 9 वर्षीय दोन मुलींचे मृतदेह बुधवारी रात्री त्यांच्या घराजवळील एका खोलीत पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येणार्या ड्रममध्ये आढळून आले होते, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
बुधवारी दुपारी 1.00 वाजताच्या सुमारास या दोन मुली घरातील अंगणात खेळत होत्या. खेळत असतांना त्या अचानक गायब झाल्या. ही घटना घरच्यांच्या लक्षात आली. त्यांनी मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, मुली सापडल्या नाही. त्यामुळे या घटनेची तक्रार पोलिसांत देण्यात आली. संध्याकाळी पोलिसांनी देखील मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्या सापडल्या नाही. यानंतर पोलिसांनी मुलींचा घरातच शोध घेतला. यावेळी रात्री 10.00 वाजताच्या सुमारास वरच्या मजल्यावर एका पाण्याच्या ड्रममध्ये दोन्ही मुलींचा मृतदेह आढळला. दोन्ही मुलींचे पाय वर व डोकं खाली होतं. मुलीचे मृतदेह पाहून घरच्यांनई टाहो फोडला. पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली.
पोलिसांनी आरोपीविरोधात पुणे जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता आणि बाललैंगिक गुन्हे प्रतिबंध (पोक्सो) कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा उत्तर भारतात कुठेतरी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला एका लॉजमधून अटक करण्यात आली अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि हत्या केल्याच्या घटनेनंतर राजगुरुनगर येथील पोलीस स्टेशन बाहेर नागरिकांचा ठिय्या आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला. यावेळी मुलीच्या नातेवाईक आणि नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे.
*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…
*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…
उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्ह्यातील बाळापूर येथून एक…
रविंद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात…
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी दिल्ली:- भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी…
भंडारा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- राज्यात महिला मुलीवर अत्याचार हत्याच्या घटना…