मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाराष्ट्र:- राज्यात सध्या चालले तरी काय? चोफर झालेले पोलीस प्रशासन आणि सुव्यवस्था रोज लहान मुलीवर महिलावर बलात्कार, हत्या हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर अंकुश कोणाच्या गुन्हेगाराचा, नेते मंडळींचा की अजून कोणाचा? त्यात बीड जिल्हातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने तर महाराष्ट्र हादरला आहे.
९ डिसेंबर २०२४ रोजी बीड जिल्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अतिशय निर्घृण पणे हत्त्या करण्यात आली आणि या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. संतोष देशमुखांची हत्या का आणि कश्यासाठी सहाजिकच हा प्रश्न जनतेला पडला. तसाच तो मलाही पडला एकूणच बीड जिल्ह्याचा विचार करता ईथे गुन्हेगारी प्रचंड स्वरूपात आहे आणि याला राजकीय वरदहस्त आहे हे सर्वश्रुत आहे. गेल्या कित्तेक वर्षापासून बीड जिल्ह्यात मुंडे परिवाराचे वर्चस्व आहे. आधी गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे म्हणजेच या सर्व गुन्हेगारीला एक प्रकारे मुंडे परिवाराने खत पाणी घातले अस म्हणता येईल.
९ डिसेंबर २०२४ रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. पवनचक्की खंडणी प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आली असावी असा अंदाज आहे. ९ डिसेंबरला दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास संतोष देशमुख त्यांच्या आते भावासोबत जात असताना केज टोल नाक्याजवळ MH ४४ Z ९३३३ क्रमांकाची काळा रंगाची स्कॉर्पिओ गाडी ने काही लोक आली आणि त्यांनी देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडी थांबविली लगेच कोयता, काठ्या घेऊन काही लोकांनी संतोष देशमुख यांना मारहाण सुरू करत त्यांचं अपहरण केलं आणि केजः च्या दिशेने घेऊन गेले. सोबत असलेल्या त्यांच्या आतेभावाने संतोष देशमुख यांच्या भावाला गाठून लगेच पोलीस स्टेशन मध्ये या घटनेची माहिती दिली पणं तब्बल 3 तास पोलिसांनी त्यांना बसवून ठेवलं आणि तक्रार दाखल करून घेतली नाही शेवटी तीन तासांनी त्याच पोलीस स्टेशन मध्ये त्याच पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की संतोष देशमुख सापडले आहे पणं मृत अवस्थेत आहे.
विश्वास बसणार नाही असा हा घटनाक्रम आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात घडते आणि आपली यंत्रणा शंढ बनून गुन्हेगारांना साथ देते. या प्रकरणात या पोलीस अधिकाऱ्यांनी इथे गुन्हेगारांना साथ दिली असल्याचं स्पष्ट जाणवते वेळीच दखल घेतली असती तर जीव वाचू शकला असता. या हत्येचा मास्टर माईंड हा वाल्मीक कराड आहे अस म्हंटले जाते. वाल्मीक कराड कोण तर मुंडे परिवाराने पोसलेला एक गुंड. जो आधी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरकाम करायचा पडेल ते काम करायचा नंतर गोपीनाथ मुंडे यांची सावली म्हणून वावरू लागला. सत्तेच्या हव्यासापोटी त्याने गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक साधली आज तो धनंजय मुंडे यांचा हस्तक म्हणून बीड जिल्ह्यात काम करतो.
रेतीचे अवैध व्यवसाय, पवनचक्की मालकाकडून खंडणी वसूल करणे अडसर ठरू पाहणाऱ्या लोकांची राजकीय हत्या असे एक ना अनेक अवैध काम हा वाल्मीक कराड बीड जिल्ह्यात करतो आणि याला धनंजय मुंडे यांचा वरदहस्त आहे हे बीड जिल्ह्यात कोणीही सांगेल. मध्यंतरी पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत टीका करताना म्हणाल्या होत्या जी बीड जिल्ह्यात पालकमंत्रीपद हे भाड्याने दिले आहे. ते वक्तव्य वाल्मीक कराड याच्या बद्दलच होत.
बीड जिल्ह्यात एक नाही अनेक राजकीय हत्या झाल्या त्या मागे नेमक कोण हा शोधाचा विषय होऊ शकतो . पणं त्याचा शोध घेणार कोण कारण कायदे बनवणारे च गुन्हेगारांचे पाठीराखे बनून बसले असल्याचे चित्र आहे. त्यातील काही घटनाक्रम. संदीप ढीगोळे यांची हत्या झाली २००१ मद्ये घटस्थापनेच्या दिवशी त्यांची हत्या केली किशोर फड यांनी. २००८ मद्ये विजयादशमी चे दिवशी किशोर फड यांची हत्या झाली त्यांची हत्या करणारा व्यक्ती काकासाहेब गर्जे. २०१५ ला घटस्थापनेच्या दिवशी काकासाहेब गर्जे यांची हत्या होते. ती कोणी केली त्याला अजून अटक नाही. हे सर्व लोक कोणासाठी काम करत होते? तिथले पोलीस प्रशासन कोणासाठी कामत करते? वर सांगितलेले हत्तेचे प्रकरण हे प्रातिनिधिक आहे अश्या कित्तेक राजकीय हत्या झाल्या आणि त्या पचवल्या गेल्या .या गुन्हेगारीला बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेच संपूर्ण सहकार्य आहे त्याशिवाय हे शक्यच नाही. आणि या सर्व गुन्हेगारांना पाठबळ देणारे महाराष्ट्र राज्याचे सद्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे जे गेले दहा वर्ष बीड जिल्ह्याचे पालमंत्री राहिले आहे.
पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे समीकरण सध्या रूढ होत आहे मग निवडणुका लढण्यासाठी जिंकण्यासाठी पैसा हवा तो कसा येईल तर त्यासाठी अवैध व्यवसाय करायचा आणि त्यात कोणी आडवे आले तर त्याला कायमचा संपवायचा या साठी राजकीय वजने वापरून पोलीस यंत्रनेचा वापर करायचा हा खेळ सध्या महाराष्ट्रात जागोजागी सुरू आहे . धनंजय मुंडे यांची लग्नाची एक बायको, तर करुणा शर्मा ही दुसरी जीच्या पासून धनंजय मुंडे यांना अपत्य आहे सोबतच करुणा शर्मा यांची लहान बहीण तिच्यासोबत देखील अनैतिक समंध असल्याचे पुरावे प्रसार माध्यमांनी समोर आणले. या सर्व गोष्टी ते करू शकले दहशतीच्या जोरावर…
यवतमाळ जिल्ह्यातील आमदार संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या तरुणीशी अनैतिक संबंधातून हत्या केल्याचे आरोप झाले तसे पुरावे सुद्धा प्रसार माध्यमांद्वारे समोर आले पणं आज सुद्धा ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विराजमान आहेत. कुठे रेती माफिया, कुठे भू माफिया, कुठे सख्रत सम्राट तर कुठे खंडणी वसुली. पण महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे काय? कायदा बनवणारे जर गुन्हेगार असेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेने नेत आहोत आपण. येणाऱ्या काही दिवसात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांची देखील हत्या होईल आणि प्रकरण फाईल बंद होईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे आणि संजय राठोड या दोघांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी ही सर्वसामान्य जनतेची मागणी.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील यशवंत नगर मॉस्टर…
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- राजूभाऊ भुजाडे यांची भारतीय…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
संतोष मेश्राम,राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- दि, ३० डिसेंबर रोजी निषेध…
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ३१ डिसेंबर:- शिक्षण विभाग…
महालक्ष्मीचे काष्ट्यशिल्प भेट, कोरडी महालक्ष्मी दर्शनासाठी निमंत्रण, मोदी यांनी दिल्या संघटनात्मक टिप्स. पल्लवी मेश्राम उपसंपादक…