*_नवजीवन नर्सिंग स्कूल चामोर्शी येथे परिचारिका शपथविधी कार्यक्रम संपन्न…_*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
दिन.०४ जानेवारी २०२५
चामोर्शी येथील नवजीवन नर्सिंग स्कूलमध्ये परिचारिका शपथविधी कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री माननीय अशोकजी नेते यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमात परिचारिकांनी (सिस्टर) मेणबत्ती पेटवून शपथ घेतली. या प्रसंगी बोलताना मा.खा. अशोकजी नेते यांनी परिचारिका व्यवसायाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. परिचारिका प्रशिक्षणातून सुसज्ज झालेल्या परिचारिकांद्वारे समाजाला आरोग्याची महत्त्वपूर्ण सेवा दिली जाते. कोरोनाच्या कठीण काळात आरोग्य सेवकांनी देशाच्या आरोग्य व्यवस्थेत मोलाचे योगदान दिले. त्या काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी रेमडेसिव्हर इंजेक्शनपासून ते इतर आवश्यक साधनांची उपलब्धता योग्य रीतीने सुनिश्चित केली. मी अशा सेवेला सलाम करतो.”
प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन:
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम आणि सहकार आघाडीचे जिल्हा प्रकोष्ठ अध्यक्ष व नगरसेवक आशिषभाऊ पिपरे यांनीही प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी मंचावर प्रामुख्याने माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते,जेष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे, नवजीवन नर्सिग काॅलेज चे प्राचार्य गोरडवार सर,चामोर्शी ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. क्रिष्णाजी वाघमारे, संस्थापिका गोवर्धन मॅडम, डॉ.मृणाली गोवर्धन, डॉ. वैभवी गोवर्धन,तसेच नवजीवन नर्सिग काॅलेज चे कर्मचारी व सिस्टर स्टाफ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवजीवन नर्सिंग स्कूलचे सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारीवर्ग यांनी परिश्रम घेतले. उपस्थित सर्व मान्यवरांनी परिचारिकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आरोग्य सेवेसाठी समर्पित परिचारिका तयार करणाऱ्या नवजीवन नर्सिंग स्कूलच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
निकृष्ट दर्जाचे घनकचरा व्यवस्थापनाचे बांधकाम आमदार देशमुख यांनी थांबवले. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- ६ जानेवारी १८३२ रोजी आपल्या…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.06:- शासनाच्या विविध योजनांचा…
अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शहरातील वाशिम बायपास रोड ते किल्ला…
विश्वनाथ जांभूळकर एटापली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापली:- तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने…