*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दर्शवली उपस्थिती…!*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
भामरागड : तालुक्यातील बेजुर या गावाला लागून असलेल्या बेजुर कोंगा पहाडीच्या पायथ्याशी बाबलाई मातेच मंदिर आहे.येथील दर वर्षी आदिवासी बांधव व गैर आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने यात्राचे आयोजान करत असतात.जल जंगल जमीन याच्या वर आधारित असणारे आदिवासी बांधव नवीन वर्षाच आतुरतेने वाट बघत असतात.
१ जानेवारी ते ३ जानेवारी पर्यंत बाबलाई माता वार्षिक पुजा व सांस्कृतिक संम्मेलनाचे आयोजन भामरागड पट्टी पारंपरिक गोटुल समितिच्या वतीने करण्यात येते.माता बाबलाई ही आदिवासी बांधवांची प्रमुख देवता आहे.शेकडो वर्षांपासून परिसरातील लोक इथे पारंपरिकरित्या एकत्र येत असतात.
भामरागड क्षेत्रात जानेवारी महिन्यात धान कापणी संपलेली असते आणि नवीन धान खायला सुरुवात व्हायची असते.आदिवासी समुदाया मध्ये कोणत्याही नवीन वस्तु खाण्यापूर्वी किंवा कामाला सुरुवात करण्यापूर्वी पंडूम म्हणजे पुजा केली जाते.धान हा इथला महत्त्वाचा पीक आहे.म्हणून लोक नवीन धान खायला सुरुवात करण्यापूर्वी पिंडी पंडूम करतात.
या निमित्याने क्षेत्रातील आदिवासी बांधव व गैर आदिवासी बांधव एकत्र येतात व बाबलाई मातेची पुजा करतात.आज या बाबलाई माता वार्षिक पुजा – सांस्कृतिक संम्मेलानात आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी उपस्थित दर्शवून मातेच दर्शन घेऊन या पूजासाठी आर्थिक मदत केली आहे.
यावेळी अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.कन्ना मडावी साहेब,होड्रीचे ग्रामपंचायतचे सरपंच किशोर काळंगा,भामरागड नगर पंचायतचे उपाध्यक्ष विष्णु मडावी,भामरागड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी,भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी,दानु आत्राम,रेणू बोगामि,पेरमेलीचे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद आत्राम,मेडपली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलादी,आलापली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,नरेश गर्गम,मडवेलीचे पेसा अध्यक्ष काशिनाथ मडावी,कुसराम काका,झोडे सर,इश्टाम सर,संतोष उसेंडी,बिरजू तेलामी,महेश अलोने,सचिन पांचाऱ्यासह भामरागड इलाका पट्टीचे सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निकृष्ट दर्जाचे घनकचरा व्यवस्थापनाचे बांधकाम आमदार देशमुख यांनी थांबवले. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- ६ जानेवारी १८३२ रोजी आपल्या…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.06:- शासनाच्या विविध योजनांचा…
अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शहरातील वाशिम बायपास रोड ते किल्ला…
विश्वनाथ जांभूळकर एटापली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापली:- तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने…