श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- बीड जिल्हा गुन्हेगारीच्या विविध घटनेने गाजत आहे. त्यात आता बीड जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. बीड मध्ये पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. अनंत इंगळे असं गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ड्युटीवर असताना टोकाचं पाऊल उचलले आहे.
पोलीस प्रशासनात माजली खळबळ: पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात अनंत इंगळे यांनी गळफास का घेतला ? त्यांच्या आत्महत्येमागं नेमकं कारण काय आहे ? याची माहिती अजूनही समोर आलेली नाही. पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. पण कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याने अशाप्रकारे आत्महत्या केल्यानं बीडच्या पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून आत्महत्येच्या कारणाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध? मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे कुटुंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा पूर्ण केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मृतक अनंत इंगळे यांना कसला तणाव होता का? यामागचं कारण समजू शकल नाही. या आत्महत्येशी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचाही तपास पोलीस करत आहेत.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा. गडचिरोली - NDTV…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील विविध विकास कामे गेल्या…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- समाजातील ज्येष्ठांची अनुभव समृद्धी आदर्श…
उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ…
पंचायत समिती हिंगणघाट येथे आयोजित पाणी टंचाई सभेत निर्देश अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय,…