प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आष्टी तालुक्यातील भारसवाडा गावातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. येथे नवीन घराचे बांधकाम सुरु असल्यामुळे भिंती व बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेलेल्या महिलेला पाणी मारत असताना विजेचा जोरदार झटका बसल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. संगीता पन्नासे असे मृतक महिलेचे नाव असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आष्टी तालुक्यात येणाऱ्या भारसवाडा येथे राहणाऱ्या राजेंद्र पन्नासे व संगीता पन्नासे यांचे गावात हॉटेल आहे. राजेंद्र पन्नासे यांना 3 महिन्यांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले आहे. या मंजूर घरकुलाच्या बांधकामला सुरवात करण्यात आली होती. घराचे काही काम झाले आहे. यामुळे बांधकाम मजबूत व्हावे म्हणून पन्नासे दाम्पत्य घर बांधकाला नियमित पाणी मारत होते.
पण नवीन घरातच झाला घात: आज सकाळच्या सुमारास मृतक संगीता यांनी हॉटेल उघडले. यानंतर पती राजेंद्र यांना दुकानात आल्या नंतर त्या नव्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी घटणास्थळी गेल्या होता. पाणी मारून झाल्यावर त्यांनी पिलरच्या लोखंडी आसारीला हात लावला आणि काळाने डाव साधला. हात लावला त्या ठिकाणी वीजपंपाची वायर होती. यामुळे वीजेचा झटका लागताच संगीता यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती शेजारी महिलांना माहिती झाली. त्यांनी राजेंद्रशी संपर्क साधला.
बातमी एकताच पती झाला बेशुद्ध: नविन घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना पत्नीचा शॉक लागून मृत्यू झाला. दरम्यान याची माहिती पती राजेंद्र यांना मिळताच त्यांना धक्का बसला आणि ते बेशुद्ध पडले. गावकऱ्यांनी त्यांना धीर देत शुद्धीवर आणले. यानंतर राजेंद्र हे तत्काळ बांधकामस्थळी पोहचले. वीज पुरवठा बंद केला. यानंतर संगीता यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता संगीताला मृत घोषीत केले. या घटनेची तळेगाव पोलिसांनी नोंद घेतली आहे.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा. गडचिरोली - NDTV…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील विविध विकास कामे गेल्या…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- समाजातील ज्येष्ठांची अनुभव समृद्धी आदर्श…
उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ…
पंचायत समिती हिंगणघाट येथे आयोजित पाणी टंचाई सभेत निर्देश अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय,…