मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा. गडचिरोली – NDTV व बस्तर जॅक्शन चे पत्रकार मुकेश चंद्रकार छत्तीसगड यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून त्यांच्या मारेकरांना फाशिची शिक्षा देण्यात यावी तसेच गडचिरोली जिल्हयात रेती , मुरूम माफीया , दारू विक्रेते यांचे अवैध धंदे बंद करावे तसेच जिल्ह्यातील पत्रकार हे वृत्तांकन करण्यासाठी नक्षलग्रस्त भागात जात असतात. मुकेश चंद्राकार यांची पुर्नरावृत्ती गडचिरोली जिल्हयात होवू नये .महाराष्ट्र शासन अधिनियम सन २०१९ क्र. १९ दिनांक ८ / १० / २०१९ राजपत्रानुसार जिल्ह्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे आदि मागण्याकरीता गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढून जिल्ह्याधिकारी अविशांत पडां व जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल यांना मागण्याचे निवेदन यांच्या मार्फतीने देशाचे महामहिम राष्ट्रपती महोदया , पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा ,महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल , मुख्यमंत्री छत्तीसगड , महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस आदिना मागण्याचे निवेदन देण्यात आले. सदर मोर्च्यात पत्रकार प्रा. मुनिश्वर बोरकर , व्येंकटेश दुडमवार , लोकमत पत्रकार संजय टिपाले , सुरेश पद्मशाली , मुकुंद जोशी , उदय धक्काते , हेमंत डोर्लीकर , प्रल्हाद म्हशाखेत्री ,प्रकाश ताकसांडे , प्रकाश दुबे ‘जगदिश कन्नाके , मारोती भैसारे ‘ विलास ढोरे , सुरज हजारे ‘राजरतन मेश्राम , प्रा. दिलीप कवरके , नाशिर जुम्मनशेख , हेमंत दुनेदार ‘ महेश सचदेव ,कैलास शर्मा ‘दिनेश बनकर , कृष्णा वाघाडे,हस्ते भगत , नशिर शेख , भाविकदास कळमकर , मुकेश हजारे , संदिप कांबळे , विनोद कुळवे , किशोर खेवले , सोमनाथ उईके ‘ निलेश सातपुते , श्रीमंत सुरपाम, शंकर ढोलगे ,जयंत निमगडे ‘ हर्ष साखरे , कबिर निकुरे , प्रमोद राऊत , विजय शेडमाके , टावर मडावी , उमेश ग जलपल्लीवार , पुंडलिक भांडेकर ,अनुप मेश्राम , श्रावण वाकोडे , कालिदास बुरांडे , धनराज वासेकर , विलास वाळके. ‘गोर्वधन गोटाफोटे , रवि मंडावार , राजेश खोब्रागडे ‘चोखोबा ढवळे ‘सतिस ढेभुर्णे ‘गेडाम , धम्मपाल दुधे ‘ नाजुक भैसारे , रेखाताई वंजारी , विजयाताई इंगळे , तिलोतमा हाजरा आदि साहित जिल्हयातील 150 पत्रकार उपस्थित होते.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना जानेवारी 2025 अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा समतोल…
रवींद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- येथून एक संतापजनक घटना…
आसमा सय्यद, पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- उंड्री येथून एक खळबळजनक…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील विविध विकास कामे गेल्या…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- समाजातील ज्येष्ठांची अनुभव समृद्धी आदर्श…