इंटिग्रेटेड फर्टीलायझर कॉम्प्लेक्स वफेरो अलॉईजचा कारखाना आल्यास या क्षेत्राचे चित्र बदलेल.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ९ जाने:- आपण सर्वांनी मला खूप खूप आशीर्वाद दिले. त्या प्रेमासाठी, त्या आशीर्वादासाठी, त्या एवढ्या सगळ्या मतदानासाठी मी तुमच्यापुढे हात जोडून इथे आभार व्यक्त करतो. यापुर्वी सावनेर विधानसभा क्षेत्रात जोर जबरदस्तीचं, दबावाचं, गुंडागर्दीचे, अवैध व्यवसायाचे, चुकीच्या लोकांना सोबत घेऊन जनसामान्यांना त्रास देण्याचे राजकारण झाले. आता आपल्याला सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात चांगल्या संस्कृतीचं, चांगल्या विचारांचं, चांगल्या विकास कामांचं राजकारण करायचं आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की, तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून मी प्रेमाने, जिव्हाळ्याने, आपुलकीने तुमची सर्वांची सेवा करीन. आपल्या प्रत्येक मताची परतफेड विकासकामांच्या माध्यमातून, जनहित कामांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये करून दाखवण्याची जिद्द माझ्या मनामध्ये आहे. त्यासाठी दिवस रात्र आपण मेहनत करतो आहे. सावनेर-कळमेश्वर क्षेत्रामध्ये असलेल्या पोटेन्शिअलच्या माध्यमातून या विदर्भातच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये या विधानसभा क्षेत्राला एक नंबर करण्यासाठी आपण सर्वजण काम करू.
मला इथे विचारण्यात आले की, समजा केदार साहेब लढले असते तर काय झालं असतं? मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आमची नाराजी वहिनींबद्दल नाही. त्या २६ हजार मतांनी पडल्या. पण साहेब उभे राहिले असते तर ५० हजार पेक्षा जास्त मतांनी पडले असते. एका व्यक्तीमुळे आपल्या सावनेरला महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये खाली पाहण्याची वेळ आली. आपल्याला आता नव्या दमाने, नव्या जिद्दीने विकासाचा संकल्प घेऊन या क्षेत्राचे नाव मोठे करायचे आहे. चांगलं काम करू, लोकांची चांगली सेवा करू आणि त्यामुळे तुम्हाला गर्व होईल की, तुम्ही सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे निवासी आहात.
निवडणुकीनंतर मुंबई येथे मंत्रालयातल्या बऱ्याच अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आपल्या या सावनेरला येणाऱ्या काळामध्ये सावनेर मॉडेल सिटी बनवायचे प्रयत्न सुरू केले. मागच्या ३० वर्षापासून भकास झालेल्या आपल्या सावनेर शहराची परिस्थिती बदलायची आहे. ती बदलण्याच्या दृष्टीने आपल्या सावनेरमध्ये चांगले असे मार्केट, नदीचे सौंदर्यीकरण, मुलांना खेळण्यासाठी चांगल्या सुविधा, क्रीडा संकुल, वाचनालय यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. सावनेरचा डीपी मंजूर करतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील असल्यामुळे आपल्याला हवी ती मदत त्यांच्याकडून घेता येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि संपूर्ण केंद्र व राज्य सरकार हे त्यानिमित्ताने आपली ताकद आहे आणि याच भरोशावर तीस वर्षापासून मागास राहिलेल्या आपल्या सावनेरला येणाऱ्या काळामध्ये सावनेर मॉडेल सिटी नक्कीच बनवायचे आहे.
आपल्या संपूर्ण भागात या जनतेच्या अपेक्षा आरोग्याच्या दृष्टीने देखील आहेत. एवढ्या मोठ्या तालुक्यात अजूनही शासनाचा इथं दवाखाना नाही. म्हणून आम्ही जिनिंगच्या बाजूला असलेल्या क्वार्टरच्या जागेवर येणाऱ्या काळामध्ये १०० खाटेचा उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव हा मंजूर करण्यासाठी पाठवला आहे. कलेक्टरच्या माध्यमातून त्या जागेचे हस्तांतर झाले तर नक्कीच तिथे १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय बनविण्यात येईल. त्यात पूर्वी ट्रॉमा सेंटरची बांधकामाची परिस्थिती आहे ती ८० टक्के पुर्ण झाली आहे. त्याच्या माध्यमातून एक्सीडेंटच्या रुग्णांच्या दृष्टीने तर नक्कीच मदत होणार आहे. विशेष करून आयसीयु, डायलिसिसची सुविधा चालू करण्याच्या संदर्भामध्ये १५ जानेवारीला तीन वाजता इथे गव्हर्मेट मेडिकल कॉलेजच्या टीम सोबत आपण बैठक बोलावली आहे. त्या माध्यमातून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गरजेच्या सुविधा आपण तिथे त्वरीत चालू करू. लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूरच्या माध्यमातून मी अत्यंत कमी खर्चात आणि शक्य असेल तिथे निःशुल्क उपचार सेवा प्रदान करीत आहे. आज आपलं राम गणेश गडकरीच्या नावाने ओळखल्या जाणारे हे शहर असून याचे गतवैभव प्राप्त करून देण्याचा आपला प्रयत्न आहे.
या संपूर्ण भागामध्ये जी काही अवैध कामे चालतात त्यावर कारवाई मागच्या महिन्या भरापासून चालू झालेली आहे. शाळा नूतनीकरण, दर्जेदार आधुनिक शिक्षणावर देखील आपण भर देत आहोत. पॉलिटेक्निक आणि इतर उच्च शिक्षणासाठी नागपूरला जाण्याची गरज पडणार नाही.
नॅचरल गॅसची पाईपलाईन देखील आपल्या भागातून जात आहे. योगायोगाने ती कळमेश्वर, सावनेर, केळवदच्या मार्गे आपल्या दोन्ही तालुक्यांमधून जात आहे. या नॅचरल गॅस पाईपलाईनच्या आधारे मध्य भारतातील सर्वात मोठा खतांचा कारखाना, इंटिग्रेटेड फर्टीलायझर कॉम्प्लेक्स ज्याच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, तेलंगाना, छत्तीसगड, मध्यप्रदेश या सर्व भागांसाठी फायद्याचा ठरू शकतो. देवेंद्र फडणवीस, अमित शाह, जयप्रकाश नड्डा यांच्या सहकार्याने जर येथे पब्लिक अंडरटेकिंग सेक्टरच्या माध्यमातून जर हा प्रकल्प उभारला तर या तालुक्याचं चित्र बदलू शकतं.आपल्या शेतकऱ्यांना कमी दरात खत उपलब्ध होईल. युवक, युवतींना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. या प्रकल्पासाठी आपण निश्चितच यशस्वी प्रयत्न करू.केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सुद्धा यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आपल्याला आश्वासन दिले होते.
नागपूर जिल्ह्यामधील एमआयडीसी आणि मिहान येथे मोठे उद्योग येण्यासाठी जागा राहिलेली नाही आणि म्हणून यासंदर्भात अपल्या क्षेत्रात औद्योगिक विस्तारीकरण करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या १६ तारखेला आम्ही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक ठेवली आहे.आपल्या इथे वीज,पाणी,मेहनत करणारा तरुण वर्ग उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या भावासंदर्भात देखील आम्ही लक्ष घालणार आहोत.
गुमगाव येथे मॉईलची खाण आहे. या भागात फेरो अलॉईजचा कारखाना निर्माण करण्यासाठी यशस्वीरित्या प्रयत्नशील आहे. या कारखान्यासाठी सहमती देखील मिळाली आहे. यासाठी कमी दरात वीज उपलब्ध करून दिली तर कारखान्यासाठी फार मोठी मदत होईल. त्यामुळे खापा भागातील आपल्या तरुणांना, तरुणींना नक्कीच रोजगार मिळेल. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार, बाजारपेठ आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. पाटणसावंगीचा टोल महिन्याभरात हटणार. १७ जानेवारीला नगर परिषद सावनेर येथे जनता दरबार आयोजित करणार. दर शुक्रवारी सावनेर येथील कार्यालयात स्वतः उपलब्ध राहणार. येणाऱ्या काळात नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्या जिंकणार. जनतेच्या सूचनांनुसार विकास कामे करणार असे प्रतिपादन सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचे भाजपाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले. ८ जानेवारी २०२४ ला सावनेर येथे आयोजित आभार सभेत ते बोलत होते.
आभार सभेच्या सुरूवातीला भाजप पदाधिकारी द्वारे आ. डॉ. आशिष देशमुख यांचे हार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी मंचावर डॉ. आयुश्री देशमुख, भाजप सावनेर विधानसभा प्रभारी डॉ. राजीव पोतदार, अँड. प्रकाश टेकाडे, किशोर चौधरी, नागपूर जिल्हा सचीव रामराव मोवाडे, सावनेर तालुका अध्यक्ष मंदार मंगळे, सावनेर शहर अध्यक्ष राजू घुगल, माजी नगरसेवक सुजीत बागडे, अँड. शैलेष जैन, माजी जि.प. उपसभापती मनोहर कुंभारे, तुषार उमाटे, पियुष बुरडे, प्रफुल मोहटे, महेश चकोले, प्रमोद ढोले, विनोद बुधोलिया, दिगांबर सुरतकर, अँड.अरविंद लोधी सह अनेकांची उपस्थिती होती.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १० जाने:- सावनेर तालुक्यातील…
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 10 जाने:- मनोज गौरकार…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.10:- शिक्षण प्रणालीत आमुलाग्र…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे,…
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यातील मौजा स्मार्ट ग्राम…
लातूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन लातूर:- प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. तो…