पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- हुंड्यासाठी आजही विवाहितांचे छळ सुरू आहे. त्यात उच्च शिक्षत परिवारात सासरच्या मंडळीनी पैशांसाठी महीला वकील विवाहितेचे शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणात नागपूर शहरातील अजनी पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.
नागपूर शहरातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील एक उच्च शिक्षित सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी मानसिक आणि शारिरिक छळ होत असल्याचा आरोप एका महिला वकिलाने न्यायाधीश सासरे, व्यवसाय करणारा पती आणि सासरच्या अन्य मंडळी विरूध्द पोलीसात तक्रार दाखल केली आहे. पिढीत महीला वकीलाने केलेल्या या तक्रारीमध्ये सासरच्या मंडळींवर अनेक गंभीर आरोप लावल्याने संपूर्ण नागपूरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपुर शहरातील एका महिला वकिलाने पतीकडून वारंवार अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची, तसेच सासरच्या घरात जादूटोणा भानामती सारखे प्रकार करण्यात येत असल्याची तसेच या महिला वकिलाला न्यायालयात जाण्यास मनाई करण्यात आल्याचे आणि वकिली व्यवसाय बंद करण्यासाठी सांगितले जात असल्याची तक्रार नोंदवली आहे. तिला सासरच्या मंडळी कडून माहेरून 50 लाख रुपये हुंडा आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला असल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे.
खळबळजनक बाब म्हणजे न्यायाधीश असलेल्या सासऱ्यांकडून अश्लील चाळे करण्यात आले तसेच खोलीचे दार उघडे ठेवून झोपा आणि घरातील कॅमेरे सुरू ठेवा असे सांगण्यात येत असल्याचा आरोप देखील तक्रारीत आहे. याप्रकरणी नागपूर शहरातील अजनी पोलिसांनी पिढीत महिला वकिलाच्या पती, न्यायाधीश असलेले सासरे तसेच सासू आणि नणंद विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अजनी पोलीस करत आहे.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूरात अनैतिक संबंधातून पतीने आपल्याच…
*मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मो. नं. 9420751809* एटापल्ली 🗞️ स्थानिक भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय…
नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- प्रेमाला वय जात नसते ते कधी…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन वर्धा:- जिल्हात दारू बंदी आहे. तरी पण…
*कोणीही नायलॉन मांजा विक्री करू नये. असे आवाहन अहेरी पोलीस स्टेशन कडून दुकानदारणा करण्यात आले…