नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- प्रेमाला वय जात नसते ते कधी आणि कुणावर होऊ शकते. पण नाशिक संपूर्ण समाजात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. नाशिक शहरातील सिडको परिसरात 36 वर्षीय विवाहित 2 मुलाची आई आणि 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा पळून गेल्याने खळबळ माजली आहे. या प्रेम प्रकरणामुळे सामाजिक आणि कायदेशीर प्रश्न निर्माण झाल्याने या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, 36 वर्षीय विवाहित महिला आपल्या पती, 15 वर्षीय मुलगा आणि 10 वर्षीय मुलीसह सिडको परिसरात राहत होती. याच परिसरातील तिच्या ओळखीच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुला बरोबर तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर हे दोघे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पळून गेले. या दोघांनी काही वेळ मुंबईतील एका इमारत बांधकाम साइटवर राहिल्यानंतर पैसे संपल्याने आणि झालेली चूक लक्षात आल्याने ते पुन्हा नाशिक येते परतले.
पत्नी आणि 15 वर्षीय मुलगा गायब झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी पोलीसात वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या होत्या. मुलगा 15 वर्षीय अल्पवयीन असल्याने पोलिसांनी महिलेवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या घटनेने समाजात कायदेशीर आणि नैतिक प्रश्न उपस्थित केले आहेत.
सध्या पोलीस या विवाहित महिलेवर पोस्को कायद्यानुसार पुढील कारवाई बाबत विचार करत आहेत. या घटनेने सिडको परिसरात खळबळ माजवली असून, नागरिकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूरात अनैतिक संबंधातून पतीने आपल्याच…
*मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मो. नं. 9420751809* एटापल्ली 🗞️ स्थानिक भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन वर्धा:- जिल्हात दारू बंदी आहे. तरी पण…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- हुंड्यासाठी आजही विवाहितांचे छळ सुरू…
*कोणीही नायलॉन मांजा विक्री करू नये. असे आवाहन अहेरी पोलीस स्टेशन कडून दुकानदारणा करण्यात आले…