अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरात विकासाची झेप घेत अनेक मोठया रस्त्याचे निर्माण प्रगती पथावर आहेत. हिंगणघाट शहरात लगतच्या ग्रामीण भागातून मोठया संख्येने महिला व तरुणी शहरातील बाजारपेठ व परिसरात खरेदी व इतर कामा करिता येत असतात. ग्रामीण भागातील अनेक महिला कुणी ऑटो तर बसद्वारे किंवा खाजगी वाहनाद्वारे हिंगणघाट पर्यंत प्रवास करतात, खाजगी रुग्णालयात वैद्यकिय उपचारापासून तर बाजारपेठेतील खरेदीसाठी महिलांचा शहरात सर्वत्र मोठया प्रमाणात संचार असतो. यात शहरातील महिलांचा सुद्धा अपवाद नाही. परंतु महिला सक्षमीकरणाच्या जमान्यात महिलांची मात्र लघुशंकेच्या निमीत्ताने मोठी कुचंबणा होत असल्याचे दिसून येत आहे.
प्रवाशांचे थांबे शहरातील पेट्रोल पंप, नंदोरी चौक, उपजिल्हा रुग्णालय, बस स्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नगरपालिका चौक, इंदिरा गांधी चौक, पोस्ट ऑफीस, तहसील कार्यालय अशा अनेक ठिकाणी असून पुढील प्रवास बाजारपेठ परिसरात खरेदीचा असतो. महिला सुरक्षितता महत्त्वाची असताना महिलांसाठी राखीव असे प्रसाधनगृह कुठल्याही मार्गावर शहरातील शोधून तर मिळणार नाही. त्यावेळेस अनेक शहरी आणि ग्रामीण महिला आणि युवतींना असुरक्षितरीत्या कानोसा घेत आपली नैसर्गिक प्रक्रिया पूर्ण करावी लागते असुरक्षित वातावरणात प्रसाधन गृह शोधावे लागतात.
हिंगणघाट शहराच्या नंदोरी चौक ते डॉ.आंबेडकर चौक या रस्त्यावर महिलांकरिता कुठलेही प्रसाधनगृहच नाही. अशी परिस्थिती आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय, रेल्वे स्टेशन येथपर्यंत, त्याच प्रमाणे डॉ.आंबेडकर चौक ते कारंजा चौक येथे कुठलीही व्यवस्था जी विषेश महिलां करिता असावी अशी सार्वजनिक प्रसाधन गृहे उपाययोजना आतापर्यंत तरी नगरपरिषद हिंगणघाट यांच्या आराखड्यात आजतागायत तयार झाली नसून शहरात नव-नवीन प्रकल्प तयार होऊन मोठे मोठे एक पदरी रस्ते दोपदरी होत आहे, परंतु महिलांच्या प्रसाधनगृहाचे काय? हा प्रश्न अद्यापपर्यंत तरी प्राधान्याने कुणी विचारात घेतलेला दिसत नाही.
अनेक महिला आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी शहरातील बाजारपेठ परिसरात खरेदी असो किंवा महत्त्वाचे कुठल्याही कामाने येत असतात परंतु महिला प्रसाधनगृह महत्त्वाचे असताना कुठेही दिसून येत नाही. हा प्रश्न महिलांच्या सामाजिक स्वास्थाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही का हा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. महत्त्वाच्या मोठ्या रस्ते प्रकल्पाच्या दरम्यान महिलांसाठी प्रसाधनगृहाची कुठेतरी स्वतंत्र व्यवस्था या वाढत्या शहराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, जेणेकरुन महिलांना असुरक्षित वातावरणात आपली नैसर्गिक प्रक्रिया गर्दीचा कानोसा घेऊन करावी लागणार नाही.
तेव्हा जनप्रतिनिधी आणि नगरपरिषद हिंगणघाट यांनी महिला प्रसाधनगृहासाठी कुठेतरी महत्त्वाचे पाऊल उचलून ही समस्या मार्गी लावणे गरजेचे ठरले आहे. वाढत्या शहराच्या आवाक्यात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर रस्तोरस्ती दुकाने निर्माण झालेली आहेत, कुठे फुटपाथ निर्माण झाले आहे तर कुठे आडमार्गावर सुद्धा अनेक दुकानांची निर्मिती झाली आहे. महिलांनी आपली नैसर्गिक गरज कुठे पूर्ण करावी हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा 53…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ‘केल्याने होत आहे रे…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना…
अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व शासकिय वैद्यकीय…
प्रसिद्ध सिने कलावंत सयाजी शिंदे सह अनेक मान्यवरांची उपस्थितीत होणार कार्यक्रम संपन्न. पल्लवी मेश्राम उपसंपादक…
अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी यांचा प्रस्ताव अधिसभेत मंजूर. संतोष मेश्राम, राजुरा तालुका…