प्रसिद्ध सिने कलावंत सयाजी शिंदे सह अनेक मान्यवरांची उपस्थितीत होणार कार्यक्रम संपन्न.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे मांगल्याचे पवित्र प्रतीक घेऊन २००१ वर्षी रेड स्वस्तिक सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. सदर संस्था पौरार्त्य संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करते. गेल्या 24 वर्षांपासून मानवतावादी आरोग्य सेवेत कार्यरत असुन आता पर्यंत सुमारे 95 लक्ष गरजवंतांना आरोग्य सेवा मिळवून देणाऱ्या ह्या रेड स्वस्तिक सोसायटीचा 24 वा वर्धापन दिनानिमित्त नागपूरातील अर्जुना सेलिब्रेशन सभागृह, व्यंकटेश नगर, खामला, नागपूर येथे रविवारी १२ जानेवारी ला दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला असून यासाठी प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थितीत साजरा करण्यात येत आहे.
१२ जानेवारी स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंती दिनी तसेच राष्ट्रीय युवक दिनानिमित्त सकाळी ९ वाजता अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते या वर्धापन सोहळ्याची सुरुवात होणार असून दुपारी तीन वाजता दुसऱ्या सत्रामध्ये मिलिंद वाडकर प्रमुख सुडकेमी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, क्रांतीकुमार महाजन मुख्य समन्वयक अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलन, जय नारायण झोनल मॅनेजर बँक ऑफ इंडिया, नागपूर, संजय अग्रवाल सहआयुक्त, आयकर विभाग नागपूर या मान्यवरांच्या उपस्थितीत देशभरातील सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान व सारथी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
तरी या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा व प्रतिष्ठा वाढवावी असे आवाहन रेड स्वस्तिक सोसायटी नागपूरचे मुख्य सल्लागार अर्जुन घुगल, जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद नाईक, कार्याध्यक्ष सुरेंद्र मनपिया, मोहन देशमुख, किसन बेरिया, विजय तपाडकर, जगन्नाथ गराट, सतीश घटाटे, पांडुरंग सोनवणे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा 53…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ‘केल्याने होत आहे रे…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना…
अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व शासकिय वैद्यकीय…
अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी यांचा प्रस्ताव अधिसभेत मंजूर. संतोष मेश्राम, राजुरा तालुका…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरात विकासाची झेप…