आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका दारुच्या नशेत मद्यधुंद तरुणाने वाहतूक पोलिसांशी वाद घालत चक्क पोलिसाला मारहाण केल्याची घटना शनिवारी दि. 11 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास हडपसर येथील मगरपट्टा परिसरात घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी रात्री या तरुणाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्राप्त माहितीनुसार हडपसर वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी शनिवारी सायंकाळी मगरपट्टा परिसरातील रासकर चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर ते कारवाई करत होते. त्यावेळी एक जण तिथे थांबलेल्या नागरिकाला दगडाने मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तेथे वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाने त्याला हटकले. वाहतूक पोलिसाने हटकल्याने तरुणाने वाहतूक पोलीस शिपाई पवार यांना मारहाण केली. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली या घटनेची माहिती मिळताच हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक तसेच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले. हडपसर पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशीरापर्यंत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसाला मारहाण करणारा हा तरुण प्रचंड नशेत होता. या नशेखोर तरुण मगरपट्टा भागात एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता. तसेच या रस्त्यावरून जात असलेल्या अनेकांना तो दगड सुद्धा फेकून मारहत होता. या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असलेले वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांनी तरुणाला हटकले. हा राग अनावर झाल्याने त्या तरुणाने थेट त्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. यानंतर जमावाने या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा 53…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ‘केल्याने होत आहे रे…
अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व शासकिय वैद्यकीय…
प्रसिद्ध सिने कलावंत सयाजी शिंदे सह अनेक मान्यवरांची उपस्थितीत होणार कार्यक्रम संपन्न. पल्लवी मेश्राम उपसंपादक…
अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी यांचा प्रस्ताव अधिसभेत मंजूर. संतोष मेश्राम, राजुरा तालुका…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरात विकासाची झेप…