सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन चंद्रपुर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाक दाखवून पुजाऱ्याला एका खोलीत बांधून ठेवले आणि मंदिरातील कॅमेऱ्यावर कापड टाकून मंदिरातील दानपेटीतील लाखोंची रक्कम लुटल्याची घटना शनिवारी मध्यरात्री 12.30 वाजताच्या दरम्यान घडली. मंदिरात सशस्त्र दरोड्यामुळे शहरात आता मंदिर देखील सुरक्षित नाही अशी चर्चा सुरू आहे.
दाताळा मार्गावरील ईरइ नदीच्या काठावर तिरुपती बालाजीचे मंदिर आहे. माजी खासदार तथा कामगार नेते नरेश पुगलिया हे मंदिर संचालित करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. तथा त्यांनीच या मंदिराची उभारणी केली आहे. अतिशय देखण्या व पावन अशा या मंदिरात डिसेंबर महिन्यात नुकताच ब्रम्होत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला होता. या मंदिरात रोज शेकडो भाविक दर्शन व पूजाअर्चा करण्यासाठी येतात. दरम्यान शनिवारी रात्रीच्या सुमारास एक व्यक्ती मंदिरात आला. त्याने मंदिराचे संपूर्ण निरीक्षण केले. संपूर्ण परिसर बघितला. तसेच तिरुपती बालाजीची मूर्ती आहे त्या गाभाऱ्यात देखील पाहणी केली. त्यानंतर सदर व्यक्ती निघून गेला. मध्यरात्री 12.30 वाजताच्या दरम्यान 7 सशस्त्र दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला. त्यांनी मंदिरात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यावर कापड टाकून कॅमेरे बंद केले. त्यानंतर मंदिरातील पुजाऱ्याला बंदुकीने धाक दाखवून दोन्ही हात बांधून एका खोलीत बांधून ठेवले. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून दानपेटी फोडली व त्यातील लाखो रुपये घेऊन पसार झाले. यावेळी सातही दरोडेखोरांनी तिरुपती बालाजी यांची मूर्ती असलेल्या मंदिराचे दरवाजे तसेच लगतच्या मंदिराचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे कुलूप न तुटल्यामुळे चोरटे निघून गेले.
मध्यरात्री 2.00 वाजताच्या दरम्यान सुरक्षा रक्षकाच्या ही बाब निदर्शनास आली. त्याने या घटनेची माहिती इतरांना दिली. बंधक बनवून ठेवलेल्या पुजाऱ्याची सुटका केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यादव हे आपल्या टीम सबोत मंदिरात दाखल झाले. रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १२ जाने:- सावनेर येथे…
युवराज मेश्राम प्रधान संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बदल विरोधक…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा 53…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ‘केल्याने होत आहे रे…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना…
अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व शासकिय वैद्यकीय…