हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना समोर आल्याने पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे. हुसेन शहा असे या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
तेंदूपत्ता वाहतूक करणाऱ्या एका वाहतूकदारा लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे हुसेन शाह यांनी 3 लाख 80 हजार रुपयांची लाच मागितली होती. पण त्यांना लाच द्यायची नव्हती म्हणून या वाहतूकदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार दाखल केली होती. यांचा तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर येथील तेंदूपत्ता वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराने ऑगस्ट महिन्यात गडचिरोली येथील एका तेंदूपत्ता व्यापाऱ्याचा माल बल्लारपूर येथील बामणी येथे आणला होता, हा सौदा 19 लाख रुपयांत ठरला होता. परंतु सदर व्यापारी मालाची किंमत व वाहतूक देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे या वाहतूकदाराने संबंधित व्यावसायिका विरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी बल्लारपूरचे पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा यांनी फिर्यादीकडे व्यावसायिकाकडे अडकलेली रक्कम वसूल करण्याच्या बदल्यात 3 लाख 80 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीनंतर तेंदूपत्ता व्यापारी आणि वाहतूकदार यांच्यात 16 लाख 25 हजार रुपया मध्ये समझोता झाला असून, व्यापाऱ्याने ही रक्कम वाहतूकदाराला दिली होती.
समझोता होऊन पैसे मिळाल्यानंतर वाहतूकदाराने या व्यावसायिका विरुद्ध बल्लारपूर पोलिस स्टेशन मध्ये दाखल केलेली तक्रार मागे घेण्याचे आवाहन केले, मात्र पोलिस उपनिरीक्षक हुसेन शाह याने ही तक्रार मागे घेण्यास नकार दिला, त्याबदल्यात पोलिस उपनिरीक्षक हुसेन शाह यांनी या वाहतूकदाराकडे पैशांची मागणी केली मागणी शेवटी वाहतूकदाराने पोलिस उपनिरीक्षक हुसेन शाह यांना 50 हजार रुपये देण्याचे ठरले. पण या लाचखोर पोलीसाला लाच द्यायची नव्हती म्हणून त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यानंतर लाचखोर पोलिस उपनिरीक्षक हुसेन शाह याना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला. वाहतूकदारा कडून 50 हजारांची रक्कम स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले व पथकाने केली.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आज मकरसंक्रांत असल्यामुळे नागपूरात सर्वत्र…
*(वनश्री महाविद्यालय कोरची येथे लेखक - वाचक संवाद कार्यक्रमाचे आयोजन )* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -…
*कार्यक्रमाचे मार्गदर्शक वरिष्ठ जिल्हा प्रमुख योगेश खोब्रागडे सर प्रामुख्याने उपस्थित राहून स्वयंसेवकांना बॅग व कॅलेंडर…
*कार्यक्रमाचे मार्गदर्शक वरिष्ठ जिल्हा प्रमुख योगेश खोब्रागडे सर प्रामुख्याने उपस्थित राहून स्वयंसेवकांना बॅग व कॅलेंडर…
*अहेरी पोलिसांनी नाशिकच्या तरुणावर केला गुन्हा दाखल.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…