दुर्वा बेले ने दिली शाळेला स्वामी विवेकानंद यांची फोटो प्रतिमा भेट. स्काऊट्स – गाईड्स युनिट तर्फे कार्यक्रमाचे आयोजन.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 14 जाने:- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचा कार्यक्रम स्काउट्स – गाईड्स युनिट तर्फे साजरा करण्यात आला. यावेळी दुर्वा बादल बेले इयत्ता सहावीच्या विध्यार्थीनिने स्वामी विवेकानंद यांची फोटो प्रतिमा शाळेला भेट दिली. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून इयत्ता सहावी मधील महात्मा फुले स्काऊट युनिट व सावित्रीबाई फूले गाईडच्या विद्यार्थ्यांनी सकाळच्या परिपाठाचे सादरीकरण केले. संतोषी पवार या विध्यर्थिनीने राजमाता जिजाऊ यांच्या जिवनपठावर माहिती दिली. गाईड्स चमूने समूहगीत सादर केले. युग चव्हाण यांनी स्वामी विवेकानंद विषयी माहिती दिली. “मी स्वामी विवेकानंद बोलतोय” ही वेशभूषा देवांशू चापले यांनी सादर केले.
या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौऱ भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, स्काऊट मास्टर सुभाष पिंपळकर गाईड शिक्षिका संगीता लांडे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली धानोरकर, संतोष सागर, विजय डोंगरे तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दुर्वा बादल बेले हिने केले. दुर्वाने यापूर्वी वाढदिवसानिमित्त शाळेतील ग्रंथालयाला विवीध माहिती पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. ती नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची बाल संघटीका आहे.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक धक्कादायक घटना समोर…
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- नकली नोटा तयार करणारी…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अल्लीपुर येथे शंकरपट व्यवस्थापक कमेटी…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अभिनव विचार मंच हिंगणघाट…
भालेराव महाविद्यालयात स्वामी विवेकानंदांच्या जिवनावर आधारित व्याख्यान. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील बल्लारपूर पोलीस स्टेशन…