पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येतील एका मानसशास्त्रज्ञ-सल्लागाराच्या निवासी क्लिनिकमध्ये मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भयानक प्रकार समोर आला आहे नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरात मानसोपचार तज्ञ म्हणून उपचार करणाऱ्याने नराधमाने शेकडो मुली, तरुणी आणि विवाहित महिलांचे लैंगिक शोषण केले. त्यांचे अश्लील चित्रफिती तयार करून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करीत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. परंतु, तीन पीडित मुली व महिलांनी त्या कथित मानसोपचार तज्ज्ञाविरुद्ध लेखी तक्रार दिली. हुडकेश्वर पोेलिसांनी या नराधम आरोपीचा बेड्या ठोकल्या आहे.
नराधम मानसशास्त्रज्ञ महिला विद्यार्थिनींना त्याच्या चेंबरमध्ये नेऊन “थेरपी” च्या नावाखाली त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. गेल्या 15 वर्षांत किमान 100 पेक्षा जास्त मुलींना ब्लॅकमेल आणि लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली राजेश नावाच्या एका 45 वर्षीय मानसशास्त्रज्ञाला अटक करण्यात आली आहे. आरोपीची पत्नी आणि त्याचा आणखी एक साथीदार अजूनही फरार आहेत. दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“मानसशास्त्रज्ञाने विशेषतः मुलींना वैयक्तिक आणि व्यावसायिक मदतीचे आश्वासन देऊन आमिष दाखवल्याचा आरोप आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले. तो अशा सहली आणि शिबिरे आयोजित करत असे जिथे तो त्यांचे लैंगिक शोषण करायचा, अश्लील छायाचित्रे काढायचा आणि नंतर त्यांचा वापर त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी करायचा. आरोपीकडून ब्लॅकमेल केल्यामुळे नाराज झालेल्या एका माजी विद्यार्थिंनीने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
काही दिवसांपूर्वी एक महिला हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांना सांगितले की, ‘माझे काही अश्लील छायाचित्र फेसबुक आणि इंस्टाग्राम’वर प्रसारित होत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यामुळे पोलिसांनी या बाबत सखोल तपास केला असता. तर राजेश याचे नाव समोर आले. पीडित विवाहितेला विचारणा केली असता तिने सांगितले की, ‘मी अविवाहित असताना राजेशने माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून चोरून छायाचित्र काढले होते. तेच छायाचित्र दाखवून वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करीत आहे.’ अशी तक्रार केली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
अनेक पीडित आता विवाहित आहेत आणि सामाजिक कलंकाच्या भीतीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास कचरतात. सूत्रांचे म्हणणे आहे की हा सल्लागार पूर्वी शंकर नगरजवळील दुसऱ्या एका तज्ञाशी संबंधित होता. नंतर तिने स्वतःचे निवासी क्लिनिक सुरू केले, जे लवकरच लोकप्रिय झाले. चंद्रपूरसारख्या शेजारच्या जिल्ह्यांतील मुलीही येथे येत असत. थेरपी सुरू करण्यापूर्वी, तो मुलींना एक रंगहीन द्रव प्यायला द्यायचा, जो तो आवश्यक असल्याचे सांगत असे.
कॉम्प्युटर मध्ये शेकडो अश्लील चित्रफित: नराधम राजेशने आतापर्यंत अनेक मुली-महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. अश्लील चित्रफिती इंस्टाग्रामवर टाकण्याची धमकी देऊन तो आताही लैंगिक अत्याचार करीत होता. त्यामुळे अनेक मुली आणि महिला त्रस्त झाल्या होत्या. मात्र, अनेकींचे लग्न झाल्यामुळे संसार विस्कळीत होईल, या भीतीपोटी कुणीही त्याच्या विरुद्ध तक्रार करण्यास धजावत नव्हत्या. तो प्रत्येकवेळी मोबाईल फोन वरून अश्लील चित्रफिती काढत होता. पोलिसांनी जप्त केलेल्या त्याच्या कॉम्प्युटर मध्ये 100 पेक्षा जास्त अश्लील चित्रफिती आढळल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दुर्वा बेले ने दिली शाळेला स्वामी विवेकानंद यांची फोटो प्रतिमा भेट. स्काऊट्स - गाईड्स युनिट…
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- नकली नोटा तयार करणारी…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अल्लीपुर येथे शंकरपट व्यवस्थापक कमेटी…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अभिनव विचार मंच हिंगणघाट…
भालेराव महाविद्यालयात स्वामी विवेकानंदांच्या जिवनावर आधारित व्याख्यान. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील बल्लारपूर पोलीस स्टेशन…