लेखिका: डॉ. प्रगती सुभाष, नागपूर

मनुष्याच्या शरीर, मन आणि बुद्धीचा विकास करणारी प्रणाली शिक्षणातून विकसित होते. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व आत्मगौरव निर्माण होतो. समाजात पूर्वापार चालत आलेला आणि अजूनही अस्तित्वात असलेला जातिभेद थांबवण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

जातीभेद ही भारतीय समाजाला लागलेली कीड आहे. जात ही मानवाने निर्माण केलेली सर्वात वाईट गोष्ट आहे. ज्या समूहाचे जातीहित जातीव्यवस्थेत दडलेले आहे, तो समाज जातीव्यवस्था प्रबळ करण्याचा प्रयत्न करतो. तर ज्याच्यावर जातिव्यवस्थेेतून अन्याय होतो तो समाज ती नष्ट व्हावी यासाठी प्रयत्नरत असतो. शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र अश्या ठिकाणी जर जातीव्यवस्था पाळली जात असेल तर आम्ही कोणत्या जगात वावरतो? हा प्रश्न निर्माण होतो. जाती विरहित समाजरचना निर्माण करण्याची शिक्षकांची भूमिका फार महत्वाची असते. असे असले तरी सध्यस्थिती बघतांना आणि विदारक सत्य उघड करताना असे निदर्शनास येते की, बालवयातील विद्यार्थ्यांनाही जातीच्या विषापासून संरक्षण नाही. शाळेतील मध्यान्न भोजन बनविणारी महिला दलित समाजाची असेल तर सवर्ण विद्यार्थी चक्क जेवण सोडून देतात. दलित विद्यार्थ्यांना वेगळे बसवून जेवण दिले जात असल्याचे प्रकार खेड्यापाड्यातून निदर्शनास येतात. गुजरातमध्ये तर दलित समाजाच्या दहा वर्षांच्या मुलींना शाळेचे संडास साफ करण्यासाठी भाग पाडले जाते. स्वतःचा काहीही दोष नसताना केवळ विशिष्ट जातीत जन्मली म्हणून कठोर शिक्षा केली जाणारी हीच बालके मग शाळेपासून दुरावतात. एवढेच नव्हे तर शिक्षा कधी-कधी इतकी क्रूर असते की इंदर मेघवाल सारख्या एखाद्या चिमुकल्याला शिक्षकांसाठी असलेल्या पाण्याच्या माठाला स्पर्श केला म्हणून आपला जीव गमवावा लागतो. यावरून हे निदर्शनास येते की, आजही अस्पृश्यता पाळली जाते. जेव्हा की भारतीय संविधानाच्या कलम १७ नुसार अस्पृश्यता पाळणे हा दखलपात्र गुन्हा आहे. परंतु या कलमाचे सर्रास उल्लंघन होतांना दिसते.

आधुनिक काळातही जातच नव्हे तर पोटजातदेखील आमचा पाठलाग करतेच आहे. जातीविरहित समाजरचना निर्माण होण्यासाठी अनेक महापुरुषांनी आयुष्यभर लढा दिला. परंतु आम्ही त्या महापुरुषांनाच जातीच्या चौकटीत बंदिस्त केलेले आहे. जातीचे चटके जर आजही नवीन पिढीला सहन करावे लागत असतील तर आमच्या शासनव्यवस्थेवर, शिक्षणप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. जातीविरहित समाजरचना निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची असते. परंतु शिक्षकच जर जातीवादी विचारसरणी असणारे असतील तर ते समाजातील नवीन पिढीला काय देतील? आम्ही नवीन पिढीच्या पुढे कोणते आदर्श निर्माण करतो? एक शिक्षक म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत काय? याची चाचपणी करणे गरजेचे वाटते. वास्तविक शिक्षकाला शिक्षणाची प्रणाली व शिक्षणाचे तत्त्वज्ञान याचा संयोग साधून विद्यार्थ्यांमध्ये जाण्यासाठी तयार करावे लागते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जातीभेदविरोधी विचार पेरणे, आधुनिकतेवर भर देऊन शिकविणे हे एका आदर्श शिक्षकाचे लक्षण होय. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला जातीचा इतिहास, अस्पृश्यतेचा इतिहास माहिती होणे गरजेचे आहे. बालमनावर संस्कार करताना जातीय आधारित विचारसरणीला खतपाणी न घालता विद्यार्थ्यांमध्ये ‘समानता’ हे मूल्य रुजविण्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांवर येऊन पडते. म्हणून शिक्षकांनी नवसमाज निर्मितीमध्ये आपले योगदान देताना जातीभेदविरोधी विचार विद्यार्थी मनावर बिंबविणे गरजेचे आहे. तरच एक सक्षम समाजाचा पाया रोवण्यात शिक्षक आपली जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी होतील.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

9 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

20 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

20 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

21 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

21 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

21 hours ago