पुणे: सम्यक साहित्य परिषदेचा ३० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; सम्यक साहित्य परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन.

वैशाली गायकवाड, पुणे प्रतिनिधी

पुणे:- सम्यक साहित्य परिषदेचा ३० वा वर्धापन दिन एस. एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात पूणे येथे संपन्न झाला. या परिषदेची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले व संविधानाच्या प्रस्तावनेच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली.

यावेळी सम्यक साहित्य परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. मनोहर जाधव, मानद प्राध्यापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन (सावित्रीबाई फुले विद्यापीठ पूणे) तसेच मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी, विनोद क्षिरसाठ (संपादक, साप्ताहिक साधना) डॉ. धनंजय लोखंडे (अध्यक्ष सम्यक साहित्य परिषद) यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्व परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सम्यक साहित्य आणि समाज परिवर्तनाची सद्यस्थिती याविषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना विनोद क्षिरसाठ यांनी सम्यक म्हणजेच सकारात्मक आणि सकारात्मक म्हणजेच सम्यक दृष्टीकोन असे स्पष्ट केले. तसेच सम्यक हा शब्द जिवनात आणि लेखनात अविभाज्य घटक झाला आहे असे अधोरेखित केले. तसेच महात्मा गांधीचा ब्रिटिशां विषयीचा दृष्टिकोन आणि न्यायमूर्ती रानडेचा ब्रिटिशां विषयीचा दृष्टिकोन सौदाहरण स्पष्ट केले.

यावेळी डॉ शमशुद्दीन तांबोळी आपल्या भाषणात म्हणाले की सम्यक साहित्यात सहभाग हाच मी माझा गौरव समजतो, तसेच मी परिवर्तनाचा चाहता आहे,
प्रमुख पाहुणे डॉ मनोहर जाधव यांनी सम्यक म्हणजेच विवेक वृत्ती,डोळस भूमिका, सम्यक साहित्याने वेदना व दुःख या सद्यस्थितीचे वास्तव चित्रण केले. असे प्रतिपादन केले. शेवटी परिषदेचे अध्यक्ष डॉ धनंजय जाधव गेल्या ३० वर्षांपासूचा परिषदेच्या कार्याचा ऐतिहासिक आढावा घेऊन पुढील दिशा स्पष्ट केली. आणि पुढील काळात सम्यक साहित्य परिषदे जोमाने काम करेल आणि वेळोवेळी कविसंमेलन आणि परिसंवाद चर्चासत्रे आयोजित केली जातील असा निर्धार करून तशी आशा व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – प्राध्यापक रूपाली औचरे यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना माननीय भिमराव टोपे यांनी केली. तसेच कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शन विद्रोही कवी हर्षानंद सोनवणे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

19 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago