लेखक: ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा.
मोबाईल 9823966282
आज २ आक्टोंबर महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांचा जन्मदिवस. खर तर भारत देशात आता, संत- महापुरूष त्यांच्या जयंती-पुण्यतिथी पुरतेच स्मरणात असतात. नंतर त्यांनी सांगीतलेला विचार हा प्रत्यक्ष जनजीवनात दिसत नाही. म्हनूच साधु-संत-महापुरूषांचा भारत विदेशी ताकतींच्या गुलामीवर जगत आहे. स्वदेशीचा नारा देत आमची मुल विदेशात विदेशी कंपनीत नोकरीला लागले त्यांची बोलतांनाची राष्ट्रभक्ती सांगते, ‘भारतात आमच्या गुणाला किंमत नाही. ‘ कारण त्यांना त्यांची किंमत रूपयात नाही डॉलर मध्ये हवी आहे.
मित्रांनो आमच्याच देशात आमच्याच महापुरूषांच्या जीवन चरीत्रा संबधात संभ्रम निर्माण केला आहे. वाद विवादात आमच्या संत -महापुरूषांच्या जीवनातील सत्य लोप पावुन असत्यावर धमासान चर्चा घडतात. महापुरूषांच्या चरित्रहनना पर्यंत आमची मजल जाते.
महात्मा गांधी ज्यांच्या विचारांना जगात सन्मान आहे. जगातील अनेक अभ्यासक विद्वानांनी गांधी विचारातून स्वतःच जिवन घडवल. पण ज्या देशात मोहन करमचंद गांधी नावाच वादळ जन्माला आले त्याचं देशान गांधीतील महात्मा नाकारत त्यांचे सत्याचे प्रयोग पुस्तकात बंदीस्थ ठेवत. थर्डक्लास कामाला ‘गांधी क्लास’ म्हणून हीनवल्या जांत. ‘गांधी बुढा’ म्हणून तरूण मनावर विकृत मानसीकता बींबवीण्याचं कट कारस्थान या देशात रोज घडत असते. तरी ‘महात्मा नावाचा गांधी संपल्या का संपत नाही?’ कारण गांधी बदनाम करण्याच मोठ साहित्य भारतात आजही सातत्याने प्रकाशीत होत आहे. अशा साहित्याची विक्री पण जोरात होते आहे. गांधीच या देशात बदनाम केला नाहीतर रयतेचा राजा छत्रपती शीवरायावर, जगतगुरू संत नामदेव, तुकारामांवर भ्रम निर्माण करणार साहित्य निर्माण केल्या गेल. संत गाडगेबाबा, तुकडोजीवर चमत्कारी साहित्य निर्माण होत आहे. आजही या संत-महापुरूषांन वरील वादग्रस्थ चर्चा संपत नाही.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनात अनेक राष्ट्रीय महापुरूषांच्या भेटी झाल्या चर्चा झाली. त्यात महात्मा गांधीचा सहवासही त्यांना गांधीच्या इच्छेवरून लाभला. महात्मा गांधीच्या विचारांना राष्ट्रसंतांनी फार जवळून अनुभवल. सेवाग्राम आश्रमात एक महीन्यापेक्षा जास्त काळ गांधीच्या इच्छेवरून राष्ट्रसंतांचा मुक्काम होता.
सेवाग्राम मुक्कामात राष्ट्रसंतांची प्रकृती स्वास्थ बिघडले. तापाने काही दिवस शरीर फणफणत होत. महात्मा गांधीनीं स्वतः राष्ट्रसंतांची देखभाल केली. त्यांनी फरमान काढल होते. ‘तुकडोजी महाराजके प्रकृतीकी देखभाल हम करेंगे. ‘ असा स्नेहभाव होता दोन्ही महापुरूषांन मध्ये राष्ट्रसंत लिहतात-
“मैं गांधीजी का नही शिष्य रहा, ना गांधी मेरे कहीं भक्त रहे।
पर प्रेम था हम दोनों में बडा, वह मिट न सका कोई लाख कहे॥”
कारण अनेक विद्वान अती हुशारीने सांगतात की, “राष्ट्रसंत तुकडोजीवर महात्मा गांधी आणि विनोबां भावेंच्या विचारांचा प्रभाव आहे.”विनोबा तर लिहतात,” साहजिकच मला भूदानाच्या चक्रव्यूहात अडकलेला पाहून त्यांनी (राष्ट्रसंतांनी) मदतीसाठी धाव घेतली; आता त्यांच्या पुस्तकाला (ग्रामगीतेला) माझ्याकडून प्रस्तावना मागत आहेत.
मित्रांनो महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १०८ गीतांची गांधीनां श्रद्धांजली वाहली. ‘गांधी गीतांजली’ नावाने ह्या गीतांच पुस्तक प्रसीध्द आहे. त्यात एक गीत राष्ट्र संतांनी लिहल आहे.
गांधी किया बदनाम, हमीने गांधी किया बदनाम ॥
नहि माना उसका कुछ कहना, बिक गये झूठे दाम॥१॥
शराब पीकर गाँव बिगाडा, ‘नेता’ लेकर नाम ॥२॥
महात्मा गांधीच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांनी दारूचे घोट पाजत गाव बरबाद करून भारतीय लोकशाही बदनाम केली. आज तर गाधींचा चष्मा राजकारणांचा विषय ठरतो गांधी- गोडसेचा जय जय कार करीत. मात्र गांधी विचार दृष्टी कोणी स्वीकारत नाही.
घुसखोरी से खाये पैसे, छिपा न अब यह काम ॥३॥
धर्म नही और देश नही है, ऐसे हुए हराम ॥४॥
कुछ जो रहे नेक अबतक भी, भीखको लगे तमाम॥५॥
जे गांधी विचारांन प्रमाणे जगत आहे ते भीकेला लागलेत. माणूसकी धर्माला विसरून देशही देशोधडीला लावण्याचा प्रयत्न होतो आहे. ही खंत राष्ट्रसंत गांधी जन्मशताब्दीला लिहतात. आज भारतीय लोकशाही कुठे आहे? चिंतन करावे लागेल.
उलटी बही योजना-गंगा, मरे श्रमिक बेकाम ॥६॥
देश- विदेश के सपने देखे, मनसे भये गुलाम ॥७॥
तुकड्यादास कहे न बचोगे , पडेगें सिरपर ‘बाम’ ॥८॥
मित्रांनो राष्ट्रसंतांनी केलेली भवीष्यवाणी आजही भारतात दिसत आहे. आजही विदेशी कंपन्यांचे उत्पादने आणि विदेशी कर्जात आमची श्रीमंती लोळते आहे. श्रमीकांच्या माथी कालची गुलामी आजही शाबुत आहे. दुसऱ्या एका गीतात राष्ट्रसंत लिहतात-
नहि गांधी का राज, आजका नहि गांधी का राज ॥
वे नही चाहते थे यह शिक्षा, करे देश मुँहताज ॥३॥
वे नहि चाहते थे यंन्त्रो का, बने गुलाम समाज ॥४॥
वे नहि चाहते थे श्रमिकों की, लुटे दुनिया लाज ॥५॥
कहता तुकड्या, वे चाहते थे, देश रहे सिरताज ॥७॥
मित्रांनो महात्मा गांधी न संपणांरा आणि संपवल्या जाणारा विषय आहे. तो एक विचार आहे. त्यांच्या विचारांना विरोध होत राहील. पण त्यांच्या जीवनातील सत्याचे प्रयोग आमच्या जीवनातील दुःखाना हिंमत देतात का ? याच चिंतन आपण करूं यां. जीवन आपल सुखी आनंदी करण्यासाठी.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…