जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणे जो आपुले l
तोचि साधू ओळखावा,
देव तेथेची जाणावा l
अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं-९८२२७२४१३६
सावनेर:- याप्रमाणे मानवसेवेतच देव असतो याची प्रचिती नुकतीच लायन्स क्लब द्वारे जाणवली. सावनेर पाहिलेपार निवासी कु. शितल ज्ञानेश्वर उईके, २३ वर्षे हिचा लहानपणी तीन वर्षाची असतांना अपघात झाला आणि पुढे तिचा डावा पाय पूर्णपणे निकामी होतो. घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा फारच बेताची. परंतु हळूहळू कुबड्यांचा सहारा घेऊन ती पुन्हा आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न करते, दहावीची परीक्षा देते आणि शिवणकाम शिकून कुटुंबाचा आर्थिक स्रोत बनण्याचा प्रयत्न करते. सलाम तिच्या जिद्दीला!
शीतलला स्वबळावर चालता यावे, पायावर उपचार करण्यासाठी ती आणि तिचे वडील सतत धडपडत असतात. अशातच या होतकरू, अपंग मुलीला मदतीसाठी लायन्स क्लब धावून येतो. तिच्या अपंगत्वावर मात करण्याचा प्रयत्न सुरु होतो. लायन्स क्लब मार्फत तिला उपचारासाठी, तपासन्यांसाठी अनेकदा नागपूरला पाठविण्यात येते. अल्टीअर हेल्थ केअर नागपूर यांचे सहकार्याने शीतलसाठी कृत्रिम पायाची डिझाईन तयार होते, अनेक चाचण्या होतात आणि शेवटी चार महिन्यानंतर कुबडिशिवाय चालण्याचे स्वप्न पूर्ण होऊ लागते.
लायन्स क्लब सावनेर तर्फे नुकताच शितलला कृत्रिम पाय समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतो. या सर्व प्रवासात चार्टर प्रेसिडेंट वत्सल बांगरे, माजी अध्यक्ष ऍड. अभिषेक मुलमुळे, विद्यमान अध्यक्ष डॉ. शिवम पुण्यानी, सचिव प्रा. विलास डोईफोडे, किशोर सावल यांची विशेष भूमिका राहिली. डॉ. परेश झोपे, डॉ. अमित बाहेती, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. छत्रपती मानपुरे यांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले. अशा अनेक अपंग शितल समाजात आहेत त्यांच्या उपचारासाठी समाजातील दानशूर, संवेदनशील व्यक्तींनी पुढे येऊन लायन्स क्लब च्या उपक्रमांना हातभार लावावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केल्या गेली.
या प्रसंगी शितल आणि तिच्या वडिलांनी लायन्स क्लब पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता ऍड. मनोजकुमार खंगारे, प्रवीण टोणपे, हितेश ठक्कर, रुकेश मुसळे, प्रवीण सावल, पियुष झिंजूवाडिया, मिथिलेश बालाखे, हितेश पटेल, ऍड. प्रियंका मुलमुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…