✒️प्रशांत जगताप
वर्धा:- जिल्ह्यातील हिंगणघाट हे तालुक्याचे शहर असुन वर्धा या शहरानंतर लोकसंख्येच्या दृष्टीने जिल्हातील सर्वात मोठे शहर आहे. हिंगणघाट तालुक्यात सुमारे ७६ गावाचा समावेश असुन या गावांची आणि हिंगणघाट शहरातील लोकांची संख्या लक्षात घेता ती सुमारे ७ लाखाच्या जवळपास आहे. त्यामुळे हिंगणघाट शहरात शासकीय जिल्हा रुग्णालय व अतिविशेषोपचार रुग्णालय निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. हिंगणघाट येथे उपजिल्हा रुग्णालय आहे आणि या रुग्णालयात हिंगणघाट तालुक्याच्या सभोवताल गावातील शेकडो रुग्ण उपचाराकरिता येत असतात, शिवाय हिंगणघाट तालुक्याला लागुन असलेल्या समुद्रपूर तालुक्यातील आणि वरोरा तालुक्यातील वरोरा, खांबाडा, माढेळी इ. गावातील रुग्णही हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरीता मोठ्या प्रमाणात येत असतात. तसेच हिंगणघाट शहरातुन नॅशनल हायवे गेल्यामुळे कोणताही मोठा अपघात झाला तर रुग्णाला मोठ्या आशेने हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले जाते. परंतु या उपजिल्हा रुग्णालयात अद्यावत वैद्यकीय सेवा आणि तज्ञ डाक्टर्स उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला सावंगी, सेवाग्राम किंवा नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरिता हलवावे लागते. त्यामुळे रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. एखादा रुग्ण अतिगंभीर असेल तर त्याला आपला जिवही गमवावा लागतो.
अनेक आजार गंभीर स्वरुपाचे असतात उदा. कॅन्सर, हृदयरोग, मुत्रपिंडाचे आजार, मज्जातंतुचे आजार, टि.बी. इ. या आजारासंबंधीचे विशेष वैद्यकिय उपचार हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात होत नाहीत. तसेच हिंगणघाट शहरातील खाजगी रुग्णालयातही या आजारांवर कोणतेही विशेष असे उपचार होत नाही. त्यामुळे शहरातील आणि परिसरातील या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांचे उपचारा अभावी मोठे हाल होत असुन त्यांना इतरत्र उपचाराकरिता जावे लागते. त्यांची आर्थिक स्थिती बेताची असते असे रुग्ण इतरत्र जाऊ शकत नाही परिणामतः अनेक रुग्ण आजारांना कंटाळुन मृत्युला सामोरे जातात.
वरील वैद्यकीय स्थिती लक्षात घेता हिंगणघाट येथे शासकिय जिल्हा रुग्णालय व विशेष उपचारांनी युक्त अश्या जिल्हा रुग्णालयाची निर्मीती करणे खुप गरजेचे आहे. त्याकरिता येथे ३०० पुरुष व १०० स्त्रि बेड ची व्यवस्था करून विशेष जिल्हा रुग्णालय हा दर्जा मिळणे आवश्यक आहे. हिंगणघाट येथे हृदयरोग चिकीत्सा, मुत्रपिंड चिकीत्सा, मज्जातंतु शल्य चिकीत्सा, नवजात शिशु अतिदक्षता विभाग इ. सेवेंनी युक्त अश्या जिल्हा रुग्णालयाची उभारणी करावी. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना अनेक वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देता येईल. या मागण्यांकरिता दि. १२ ऑक्टोंबर बुधवारला सकाळी १० वाजता प्रविण ना. उपासे (अध्यक्ष, वर्धा जिल्हा किसान काँग्रेस) यांच्या नेतृत्वात टिळक चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट येथे भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे. तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान हिंगणघाट शहर/तालुका कॉ. कमिटी, किसान काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, अनु. जाती / जमाती व अल्पसंख्यांक सेल काँग्रेस यांच्या वतीने करण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…