सांगली जिल्हा प्रतिनिधी
सांगली:- अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या वतीने २ मार्च २०२२ व २५ एप्रिल २०२२ रोजी सहायक कामगार आयुक्त सांगली यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, कामगारमंत्री, प्रधान सचिव, अप्पर कामगार आयुक्त यांना कामगाराच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते.
सदर निवेदनात म्हटले होते, बांधकाम कामगारांना औषध उपचार करण्यासाठी मंडळामार्फत जिल्हा ठिकाणी स्वतंत्र्य सर्व सोयीसुविधा युक्त बांधकाम कामगार हॉस्पिटल बांधावे तसेच बांधकाम कामगाराच्या विविध सांस्कृतिक कार्यासाठी आणि मुलासाठी सर्व सोयीसुविधा युक्त शैक्षणिक वसतिगृह जिल्ह्याच्या ठिकाणी बांधकाम कामगार सांस्कृतिक भवन बांधण्यात यावे अशी मागणी केली होती. या दोन्ही मागण्याचे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला व अखेर ही मागणी कामगार मंत्री यांनी ह्या मागण्या मान्य केलेली आहे.
तसेच मंत्री मंडळात कायदेशीर ठराव करून सदरची मागणी प्रमाणे मंजूर करण्यात येणार आहे. याचा बांधकाम कामगारांना खूप आनंद होत आहे असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…