संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
राजुरा:- दिनांक 2 ऑक्टोंबर रविवार ला जिल्हा परिषद प्राथ शाळा गोपालपुर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा कोरपना, राजुरा व जिवती कार्यकारणी तर्फे सहविचार सभेचे आयोजन श्री सुभाष भाऊ बेरड जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे सत्कारमुर्ती व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. त्यामध्ये प्रमुख पाहुणे श्री पंढरी भाऊ मरस्कोल्हे सर, कोरपना अध्यक्ष श्री बंडुजी राठोड जिवती अध्यक्ष श्री मसराम राजूरा अध्यक्ष श्री विठ्ठल आवारी सर मार्गदर्शक यांनी मनोगत व्यक्त केले. श्री सुरेश पानघाटे जिल्हा उपाध्यक्ष श्री नरेश भाऊ कोरडे सर नंदाताई चंदे मॅडम महिला संघटक ज्योती आत्राम मॅडम श्री शंकर तलांडे सर सहसचिव कोरपना श्री रमेश भाऊ बेसुरवार तालुका नेता राजूरा श्री विजय वडस्कर तालुका नेता जिवती सत्कार मुर्ती व प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर श्री संजीवजी चांदूरकर सर, श्री चरणदासजी कोरडे, श्री ओमराजे भोयर सर, रामदास मंचलवार सर, श्री विठ्ठल पिंगे सर श्री अशोक पढाल सर आदर्श शिक्षक पुरस्कार श्री काकासाहेब नांगरे सर. अंबुजा फाऊंडेशन तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार श्री नरेश भाऊ कोरडे सर यांचा प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री कोरडे तसेच श्री संजीवजी चांदूरकर सरांनी मनोगत व्यक्त केले. श्री पंढरी भाऊ मरस्कोल्हे सर, श्री बंडुजी राठोड सर, श्री मसराम सर यांनी माहीती सांगितली.
सुभाष भाऊ बेरड सर यांनी आजच्या कार्यक्रमात विविध समस्यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सुभाष पाचभाई सर, विष्णू बडे सर, रामकृष्ण नागरगोजे सर, गिरीधर पानघाटे सर, भोंगळे सर, दारवटकर सर, श्रीरंग राठोड सर, सखाराम परचके सर, संजय सातपुते सर, उदे सर, श्रीकांत गुंडावार सर, उद्धव पवार सर श्री साखरकर सर, निलेश मडावी सर, मडावी सर, लोंढे सर, वडस्कर सर, आडे सर उपस्थित होते.
मरस्कोल्हे सर.श्री दिलीप भाऊ साखरकर सर, राठोड सर, उद्धव पवार सर, पोरते सर, किशोर मंदे सर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. विशेषतः पोरते सर शाळा गोपाळपूर यांनी अथक परिश्रमातून कार्यक्रमाला साथ दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल आवंडे सर यांनी केले तर उपस्थित पाहुणे व सत्कार मूर्ती यांचे आभार उमेश लांजेकर सर यांनी मानले. शेवटी वंदेमातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…