पूराने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १२ कोटी ५२ लक्षाची मदत : तालुक्यात ६९ कोटीचा विकास निधी मंजूर.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- गोंडपिपरी तालूक्यातील मोठ्या कामांच्या निविदा ज्या ठेकेदाराकडे आहेत ते कुणाचे समर्थक आहे सर्वांनाच माहित आहे कि ज्या मुळे सन २०१६- २०१७ मध्ये मंजूर असलेल्या ह्याम (हायब्रीड) कामाची आजतागायत कसलीही प्रगती नाही, नगर विकास, खनिज विकास, अर्थ संकल्प, ग्राम विकास, जिल्हा वार्षिक योजना अशा विविध योजने अंतर्गत आपण या भागात कोट्यावधी रुपयाची विकासकामे मंजूर केली आहेत. मात्र सध्याच्या सरकारने १ एप्रिल २०२१ पासून मंजूर सर्व योजनेच्या कामांवर स्थगिती आणली असुन विकास कामे रखडलेली आहेत. हे सत्य न सांगता तथाकथीत कार्यकर्ते चुकीची ब्यानर बाजी करून जनतेची दिशाभूल करीत आहेत.
राजुरा विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी गोंडपिपरी तालुक्यात विविध विकास योजनांना मंजुरी मिळवुन घेतली आहे. अतिवृष्टी, पूरपरिस्थिती मुळे, खरवडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 12 कोटी 52 लक्ष रुपयाची मदत मिळवून दिली. शेतकऱ्यांना सिंचनाची मुबलक सुविधा व्हावी या हेतुने अर्थ संकल्प 2021-2022 अंतर्गत 10 गेटेड साठवण बांधाऱ्यांसाठी 15 कोटीचा निधी मंजूर केला. प्रशासकीय ईमारत बांधकामाकरीता 15 कोटी निधी मंजुर, शहराच्या वळण रस्त्याकरिता 2 कोटी 50 लक्ष निधी मंजुर व परसोडी ते आर्वी गावात पेविंग ब्लागचे कामाकरीता 80 लक्ष, प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम ग्राम सडक योजना अंतर्गत १६ कोटी मंजुर त्यात चेकघडोली ते भानारहेटी १ कोटी ७७ लक्ष, रामा- ३६९ ते गुजरी ९२ लक्ष, रामा ३६९ (हेटी सोमनपल्ली) ते चीवडा रस्ता सा.क्र.१/०२७५ कोटी, प्रजीमा२४ ते ५४ चक लिखितवाडा ३ कोटी ६२ लक्ष, व राष्ट्रीय महा मार्ग ३५३ कारंजी ते खारळपेठ ४ कोटी ४७. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (RCPLWEA ) अंतर्गत 5 कोटी मंजुर त्यात अडेगाव ते धामणगाव 1 कोटी 11 लक्ष, व्यंकटपूर ते धानापूर 2 कोटी 23 लक्ष, सुकवासी पोचामार्गावर पुलाचे बांधकाम 1 कोटी 62 लक्ष, FDR योजने अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्ती करीता 5 कोटी 50 लक्ष, यशवंत राव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत 49 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर 59 लक्ष, ठक्कर बापा योजना मंजूर कामे 55 लक्ष, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत मंजूर कामे-19 कोटी 60 लक्ष, 2515 ग्राम विकास निधी अंतर्गत मंजुर कामे 3 कोटी 72 लक्ष, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना मंजूर कामे 29 लक्ष, गोंडपिपरी येथिल तलाव सौंदर्यी करणासाठी – 81 लक्ष, जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 1 कोटी 19 लक्ष, नक्षलग्रस्त भागाचा विकास कार्यक्रम 1 कोटी 50 लक्ष, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पांदन रस्ते 3 कोटी 84 लक्ष, एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत आदिवासी बांधवांसाठी 139 घरकुल मंजुर, भंगाराम तळोधी येथे विज उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर, भंगाराम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जनसेवेत कार्यरत.
गोंडपिपरी नगर पालिकेला रस्ता अनुदान योजना शिल्लक निधीतून 22 लक्ष मंजुर निधी उपलब्ध करून देण्यात आला, साहाय्य अनुदान योजना अंतर्गत 1 कोटी 50 लक्ष मंजुर, नगरपालिकेला वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी विशेष ठोक तरतुद योजने मधुन 85 लक्ष निधी मंजुर, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत शववाहिका (स्वर्गरथ) वाहणासाठी 13 लक्ष देण्यात आले, नगरपंचायतीला अग्निशमन वाहनासाठी 85 लक्ष मजुर केले, दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत 35 लक्ष निधी मंजुर केला, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान योजनेंतर्गत 13 लक्ष मंजुर, नागरी दलितेत्तर सुधार योजनेअंतर्गत 17 लक्ष निधी मंजुर, रस्ता अनुदान योजनेअंतर्गत 21 लक्ष मंजुर केली. शवविच्छेदन केंद्रासाठी १८ लक्ष मजुर. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत नगरपंचायतीला १८३ घरकुलांनाकरीता 1 कोटी 83 लक्ष निधी उपलब्ध करून दिला, अशी माहिती गोंडपिपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजुरा विधासभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी दिली.
या प्रसंगी गोंडपिपरी च्या नगराध्यक्षा सविता कुळमेथे, तहसीलदार के डी मेश्राम, उपविभागीय कृषी अधीकारी पवार, नायब तहसीलदार वैद्य, जेष्ठ नेते सुरेश चौधरी, कृ.उ.बा.स संचालक संभुजी येल्लेकर, अशोक रेचनकर, गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, सं गां नि योजनेचे अध्यक्ष विनोद नागापुरे, नगरसेवक राकेश पुन, नगरसेविका वनिता वाघाडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, सुनील फुकट, नितेश मेश्राम यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थीत होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…