खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी लग्नासाठी पै पै करुन साठवलेले कष्टाचे पैसे व दागिने चोरी करून हैदराबाद येथे निघालेल्या चोरास काही तासांत अटक….

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी

खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे: दिनांक ०८/१०/२०१२ रोजी ५४ एफपी १८० लोहीयानगर गंजपेठ पुणे येथे आरोपी नामे मोहम्मद तमीम कलीमउददीन चौधरी १८ वर्षे सध्या राहणार-अंजुमन मस्जिद समोर लोहियानगर पुणे, मुळ राहणार वल्लभभाई पटेल नगर रोडा मिस्त्री नगर जिल्हा – रंगारेड्डी, राज्य हैदराबाद याने फिर्यादी यांचे राहत्या घराचा दरवाजाची कडी उघडुन दरवाजावाटे आत प्रवेश करून फिर्यादीचे २,००,०००/- रुपये रोख रक्कम व १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे असे एकुण २,५०,३००/- रुपये किंमतीचा माल चोरी करुन नेल्याने फिर्यादी यानी दिलेल्या तक्रारीवरुन खडक पोलीस ठाणे, पुणे गुन्हा रजि. क्र. ३०२ / २०२२ भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन श्रीमती संगीता यादव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) खडक पोलीस स्टेशन श्री राजेश तटकरे यांनी तात्काळ दोन तपास पथके तयार करून आरोपी मोहम्मद तमीम कलीमउददीन चौधरी यास पकडणे कामी तपास पथकाचे अधिकारी व जंगलदार यांना योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन करून तपास पथके रवाना केली. त्याप्रमाणे आरोपी मोहम्मद तमीम कलीमउददीन चौधरी याचा शोध चालू असताना पोलीस अमलदार संदीप वळेकर व विशाल जाधव , सागर घाडगे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. आरोपी मोहम्मद तमीम कलीमउददीन चौधरी हा इनामके मा लोहीयानगर गंजपेठ पुणे या ठिकाणी आलेला आहे. सदर बातमीचे ठिकाणी तपास पथकाचे अधिकारी श्री. राकेश जाधव व त्यांचे पथकातील अंमलदार आहेे.

गेले असता तेथे आरोपी मोहम्मद तमीम कलीमउद्दीन चौधरी या शिताफीने पकडण्यात आले. सदर आरोपी मोहम्मद तमीम कलीमउददीन चौधरी यास गुन्हयामध्ये दिनांक ०९/१०/२०१२ रोजी अटक करण्यात आली असून, त्याचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेले २,००,०००/- रुपये रोख रक्कम व १० म वजनाचे सोन्याचे दागिणे असे एकूण २,५०,३००/- रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर कारवाही श्री. अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस सहआयुक्त, श्री राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, डॉ. प्रियंका नारनवरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ पुणे श्री. सतिश गोवेकर सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता यादव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राजेश तटकरे श्री राकेश जाधव सहा पोलीस निरीक्षक श्री अतुल मनकर पोलीस उप निरीक्षक व पोलीस अमलदार अजीज बेग, संदीप तळेकर विशाल जाधव, सागर घाडगे, लखन ढावरे, राहुल शिंगे , मंगेश गायकवाड रफिक नदाफ, अक्षयकुमारचा नितीन जाधव, महेश पवार, महेश जाधव, समीर शेख यांचे पथकाने केली

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

19 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago