सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:– जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दिनांक: 15 ऑक्टोंबर रोजी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी मुख्याध्यापक श्री. एम. डी. टोंगे तर प्रमुख पाहुणे श्री. आर. के. वानखेडे, श्री. आर. बी. अलाम सर, प्रमुख उपस्थिती श्री. यु. के. रांगणकर, श्री. एस. एम. चव्हाण, सौ. एस. एन. लोधे मॅडम यांची उपस्थिती होती.
प्रथमत: माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या फोटोला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळेचे शिक्षक श्री. आर. बी. अलाम सर यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मार्गदर्शनपर भाषण केले. अध्यक्षीय भाषण श्री. एम.डी. टोंगे माजी मुख्याध्यापक यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आर. के. वानखेडे, संचालन सौ. एस. एन. लोधे मॅडम आणि आभार प्रदर्शन श्री. यु. के. रांगणकर सर यांनी केले.
कार्यक्रमात श्री. डब्ल्यू. आर. बोबडे, श्री. एस. एन. मोरे, श्री. आय. एम. अडबाले आदी शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…