हिंगणघाट येथील विर भगतसिंग वार्ड मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा. प्रमुख पाहुणे म्हणून सुरेशदादा गायकवाड यांची उपस्थिती.

✒️प्रशांत जगताप

हिंगणघाट:- शहरातील प्रभाग क्रमांक 09 वीर भगतसिंग वार्ड मध्ये 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन वॉर्डातील छोट्या छोट्या मुला मुलींना एकत्र येत केलं. यावेळी वीर भगतसिंग वार्डातील महिला मंडळाच्या वतीने करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर तथागत गौतम बुद्ध आणि डॉ आंबेडकर आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सुरेशदादा गायकवाड उपस्थित होते. यावेळी अनुष्का खैरे, मंथन खैरे, समिधा नगराळे, मार्गदर्शक लता ताई भगत, श्वेता कांबळे, पुरुषोतम भगत, अतिश नगराळे, आकाश कांबळे, निखिल उमरे, रोजा खैरे सह वॉर्डातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोंबर 1956 ला अशोक विजयादशमी दिनी आपल्या लाखो बांधवांना मानवतावादी बौध्द धम्म दिला. ही जगातील एक अशी क्रांती होती जी कुठलही रक्त न सांडवता करण्यात आली होती. त्याचेच प्रतिबिंब म्हणजे आज शिक्षित, सुधारित बौध्द समाज निर्माण झाला आहे. या धम्म दिक्षेचा क्रांतीमुळे आज आपण माणसात आलो आहोत त्यामुळे ही घटना जागतिक पातळीवरील एक महत्वपूर्ण घटना आहे. यावेळी सुरेशदादा गायकवाड यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत आपले विचार मांडले.

यावेळी भोजन दानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो नागरिकांनी या भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी सुरेश दादा गायकवाड यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्य विकी वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने आज महाआरोग्य शिबिरचे आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…

14 hours ago

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

1 day ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

2 days ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

2 days ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

2 days ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

2 days ago