नाशिक जिल्हातील दोन अत्याचाराच्या घटनेत दोघांना कारावासाची शिक्षा, जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला महत्वपूर्ण निकाल.

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- जिल्हातील दोन वेगवेगळ्या संतापजनक घटनांमध्ये आज न्यायालयाने आपला निकाल दिला. अल्पवयीन मुलीचा विनयभंग चार वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यांना न्यायालयाने सक्तमजूरी व दंड ठोठावला आहे. रवींद्र आबाजी जगताप वय 56 वर्ष, रा. उत्तम नगर, सिडको आणि मनोज उर्फ साई शिवदास श्रीवंत वय 45 वर्ष, रा. सुभाषरोड, नाशिकरोड अशी आरोपींची नावे आहेत.

पहिल्या घटनेत 27 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी सिडकोतील उत्तमनगर येथे रवींद्र जगताप याने दहा वर्षीय मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडितेच्या आईने अंबड पोलिस ठाण्यात रवींद्र विरोधात विनयभंगासह पोक्सोची फिर्याद दाखल केली होती. अंबडचे पोलिस उपनिरीक्षक एच. एस. पावरा यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे ॲड. एस. एस. गोरे यांनी युक्तीवाद केला व रवींद्रविरोधात गुन्हा साबित झाल्याने अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. खरात यांनी रवींद्रला परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तीन वर्षे सश्रम कारावास व 1 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार सी. एम. सुळे, आर. आर. जाधव यांनी कामकाज पाहिले.

प्रकरण दोन
तर दुसऱ्या प्रकरणात मनोज श्रीवंत याने 11 नोव्हेंबर 2018 रोजी एका चिमुकल्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. पीडित मुलाच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी मनोज याने घरात एकटा असलेल्या मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. व त्याच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे ॲड. दिपशिखा भीडे यांनी युक्तीवाद केला. त्यांनी नऊ साक्षीदार तपासले. त्यानुसार अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी आरोपी मनोज यास पोक्सो कायद्यानुसार तीन वर्षे सश्रम कारावास व 8 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्य विकी वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने आज महाआरोग्य शिबिरचे आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…

1 day ago

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

2 days ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

2 days ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

2 days ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

2 days ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

2 days ago